esakal | 'टीम इंडिया'चा मेंटॉर होताच धोनीविरोधात तक्रार; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

'टीम इंडिया'चा मेंटॉर होताच धोनीविरोधात तक्रार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup: धोनीची संघाचा मार्गदर्शक (Mentor) म्हणून निवड

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. BCCIच्या निवड समितीची काल बैठक झाली. त्यात १५ खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला मार्गदर्शन करण्यासाठी दोन वेळा विश्वचषक जिंकलेल्या धोनीला निवडण्यात आले. धोनीचा अनुभव संघाला फायदेशीर ठरेल अशी भावना सर्वत्र असतानाच BCCI च्या समितीकडे महेंद्रसिंग धोनी याच्याविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

लोढा समितीच्या शिफारशींनुसार, एक व्यक्ती दोन पदे एकाच वेळी भूषवू शकत नाही. महेंद्रसिंग धोनी हा सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. त्याचसोबत त्याला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणूनही निवडण्यात आले आहे. ही बाब लोढा समितीच्या शिफारशींनुसार योग्य नाही, अशी तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे माजी आजीव सभासद संजीव गुप्ता यांनी केली आहे. या आधीही त्यांनी लोढा समितीच्या शिफारशींचा आधार घेत अनेक वेळा लाभाच्या पदांबाबतच्या विविध खेळाडूंच्या तक्रारी केल्या आहेत. धोनीच्या बाबतीत एकाच वेळी दोन ठिकाणी पदे भूषवणे म्हणजे लाभाच्या पदाच्या कलमाचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे.

हेही वाचा: T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेतील ३ उल्लेखनीय गोष्टी

गुप्ता यांनी BCCIच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या संदर्भातील पत्र पाठवले आहे. सौरव गांगुली, जय शाह यांनाही त्यांनी पत्र पाठवून ही तक्रार केली आहे. BCCIच्या नियमावलीतील कलम ३८ (४) च्या आधारे एका व्यक्तीला दोन पदे एकाच वेळी भूषवता येत नाहीत याकडे त्यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता BCCI या प्रकरणात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेईल", अशी माहिती BCCIच्या सूत्राने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

loading image
go to top