एवढे भारी खेळतात आता तरी या दोघांचे वेतन वाढवा की; गांगुलीला गळ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहेत. ते सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ व्हायला हवी असे रंगास्वामी यांना वाटते.  

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. विराट कोहली, रोहित शर्मा, महंमद शमी, उमेश यादव हे खेळाडू सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतात त्यामुळे त्यांना वेतनही भरघोस मिळते. मात्र, कसोटी संघात असे काही खेळाडू आहेत जे फक्त कसोटी क्रिकेटमध्ये खेळतात. त्यांना मात्र म्हणावे असे वेतन मिळत नाही. म्हणूनच इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (आयसीए) च्या सदस्य शांता रंगास्वामी यांनी या खेळाडूंचे वेतन वाढविण्याचा सल्ला दिला आहे. 

धोनीची निवृत्ती फिक्स; निवड समितीच्या प्रमुखांचे सूचक विधान

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहेत. ते सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ व्हायला हवी असे रंगास्वामी यांना वाटते.  

त्या म्हणाल्या,'' आपल्याकडे आधीपासूनच श्रेणी व्यवस्था आहे. विराट कोहली तिन्ही प्रकारांत खेळतो त्यामुळे तो अ श्रेणीत आहे. मात्र, काही खेळाडू आहेत जे फक्त ट्वेंटी20 किंवा कसोटी खेळतात. त्यांना त्यानुसार चांगले वेतन मिळायले हवे. गांगुली आता अध्यक्ष आहे तर याचा पुनर्विचार व्हायला हवा. असे झाल्यास खेळाडूंची चांगली जपणूक होईल.''

आता मी आलोय ना, विराटचा प्रवास आणखी सुखकर करतो बघा : गांगुली

विराटनेही वारंवार या विचाराला पाठिंबा दिला आहे. त्यावर त्या म्हणाल्या, "विराटने ज्याला पाठिंबा दिला तो विचार योग्यच आहे. पुजारासह रहाणेसुद्धा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये खेळत नाही मात्र, कसोटीतील त्यांचा खेळ पाहता त्यांच्या वेतनाबद्दल पुनर्विचार व्हायला हवा.''  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contracts of Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara should be re framed