esakal | सुपर संडे... रविवारी लवकर उठा, जागरणासही तयार रहा!
sakal

बोलून बातमी शोधा

Football

सुपर संडे... रविवारी लवकर उठा, जागरणासही तयार रहा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या वातावरणात क्रीडा क्षेत्राने आनंदाचे काही क्षण दिले. क्रिकेट, आयपीएल, टेनिस, व्यावसायिक फुटबॉल लीग आणि ऑलिंपिक पात्रता लढती समाधान देणाऱ्या ठरत होत्या. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ फुटबॉल आणि त्याची युरो व कोपा अमेरिका या दोन स्पर्धांची एकत्रित मेजवानी आनंददायी ठरलेली आहे. या सर्वांचा येत्या रविवारी परमोच्च क्षण असणार आहे, पण त्यासाठी पहाटे लवकर उठण्याची आणि रात्रभर जागण्याची तयारी मात्र चाहत्यांना ठेवावी लागेल. (Copa America 2021 Final Argentina vs Brazil EURO Cup 2020 Final England vs Italy novak djokovic wimbledon Final)

युरोपात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा असते तेव्हा त्याच वेळी विम्बल्डन स्पर्धा असली की एकाच वेळी दोन्ही स्पर्धांचे अंतिम सामने यापूर्वीही पाहायला मिळाले आहेत. यावेळी त्यात आणखी भर पडली आहे. कोपा अमेरिका आणि महिला क्रिकेटचीही मेजवानी याच वेळी अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हा रविवारी क्रीडाप्रेमींचा असणार आहे.

हेही वाचा: मुंबईकराने वॉर्नरला दिला शॉक; रिअ‍ॅक्शन व्हायरल

कोरोनामुळे 2020 हे संपूर्ण वर्ष वाया गेले. त्यावेळच्या युरो आणि कोपा अमेरिका फुटबॉल आणि ऑलिंपिक स्पर्धा यंदा होत आहेत. सुपर संडेला ‘फायनल्स’ची मेजवानीने तृप्त होत नाही तोच 18 तारखेपासून भारत-श्रीलंका एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिका रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. 23 जुलै पासून ते 8 ऑगस्टपर्यंत ऑलिंपिक स्पर्धेचा सीजन दिसेल. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिका असा साग्रसंगीत बेत आहे.

loading image