esakal | क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज गोलंदाज मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मोहम्मद शमी याच्या अडचणीत भारतीय संघाच्या देखिल अडचणी वाढल्या आहेत.

क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज गोलंदाज मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मोहम्मद शमी याच्या अडचणीत भारतीय संघाच्या देखिल अडचणी वाढल्या आहेत.

शमीच्या अडचणीत वाढ, पत्नी हसिन जहाँच्या तक्रारीवरुन आरोपपत्र दाखल

क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं असून सरेंडरसाठी त्यांना न्यायालयाने 15 दिवसांची मुदत दिली आहे. या काळात मोहम्मद शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

 

पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या अलीपूर न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या आहेत.

loading image
go to top