esakal | कोरोनामुळे आता गोलंदाजांसमोरही घोंगावणार संकट; ICC नियमावलीत होणार मोठा बदल

बोलून बातमी शोधा

covid 19, icc cricket, shine ball

क्रिकेट सामन्यात चेंडूची चमक टिकून राहण्यासाठी नेहमी खेळाडू थुंकीचा अथवा घामाचा वापर करतात. मैदानातील गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची ही कृती कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण करणारी असल्याचे काहींचे म्हणने आहे.

कोरोनामुळे आता गोलंदाजांसमोरही घोंगावणार संकट; ICC नियमावलीत होणार मोठा बदल
sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाज चेंडूला चमक आणून स्विंग करण्याची खटाटोप करत असतात. खेळपट्टीला आपल्या बाजूने खेळवण्यासाठी गोलंदाजाकडून यासाठी  थुंकीचा वापर केल्याचे पाहायला मिळते. परंतु सध्या जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातल्यामुळे गोलंदाजासमोरही पुढील काही दिवस संकटजन्य परिस्थितीचा पेच निर्माण होणार आहे. क्रिकेट सामन्यात चेंडूची चमक टिकून राहण्यासाठी नेहमी खेळाडू थुंकीचा अथवा घामाचा वापर करतात. मैदानातील गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची ही कृती कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण करणारी असल्याचे काहींचे म्हणने आहे. आता थेट ICC क्रिकेट मंडळाच्या समितीनेच यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. 

जॉन्टी ऱ्होड्सच्या मते हा भारतीय खेळाडू आहे जगातील सर्वोत्तम फिल्डर

भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली आयसीसी क्रिकेट समितीकडून  खबरदारीचा उपाय म्हणून यावर बंदी घालण्याची शिफारस केली  आहे. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थुंकीचा वापर न करता घामाचा वापर केल्यास कोणताच धोका नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच सामन्यात पंच म्हणून यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्यात यावी आणि तंत्रज्ञानाचा वापर अधिक करत  प्रत्येक डावात प्रत्येक संघासाठी डीआरएस पुनरावलोकनचा निर्णय वाढवून देण्याचा प्रस्ताव देखील यावेळी मांडण्यात आला. यापूर्वी सामन्यांसाठी दोन्ही संघातील किंवा तटस्थ पंच यांची नेमणूक करण्यात येत होती. प्रत्येक सामन्यात दोन डीआरएस पुनरावलोकनाची संधी संघाना ICC च्या नियमानुसार देण्यात येत होती. पण आता उपाय म्हणून हा तात्पुरता बदल समितीने प्रस्तावित केलेला आहे. 

भारतीय प्रेक्षकांच्या भीतीने ग्वाल्हेरमध्ये पंचांनी सचिनला नाबाद ठरवले

याआधी क्रिकेट सामन्यात सर्वांच्याच सुरक्षितेसाठी आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी दिलेल्या अहवालानुसार, चेंडूला लावण्यात येणाऱ्या थुंकीमुळे करोना विषाणू संसर्गाच्या वाढीबाबत जोखीम असल्याचे म्हंटले होते. त्यावर उपाय म्हणून तात्पुरते बदल करण्यासंदर्भात अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकमताने काही बदल प्रस्तावित केले असल्याचे  ICC ने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षितपणे क्रिकेट सामने सुरु करण्याच्या उद्देशाने समितीने वैद्यकीय सल्ल्याचीही नोंद घेत घामातून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असून  खेळण्याच्या मैदानावर आणि आजूबाजूला वर्धित ठिकाणी स्वच्छताविषयक उपायांची कठोर अंमलबजावणी केल्यास सामन्यांसाठी उपयुक्त होण्याची शक्यता वर्तविली आहे.