esakal | इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचा दुसऱ्या डोसचा प्लॅन ठरला!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricket Team

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचा दुसऱ्या डोसचा प्लॅन ठरला!

sakal_logo
By
सुशांत जाधव

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्याच्या घडीला इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 4 ऑगस्ट पासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी भारतीय संघातील सदस्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. भारतीय संघातील सदस्यांना इंग्लंडमध्ये दुसरा डोस घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यावेळी स्पष्ट केले होते. इंग्लंड सरकारने देखील यासाठी तयारी दर्शवली होती. (COVID 19 Indian cricketers to be administered second dose of vaccine on July 7 and 9)

त्याप्रमाणे आता भारतीय संघातील सदस्य 7 आणि 9 जुलै रोजी कोरोना लशीचा दुसरा डोस घेणार आहेत. बुधवार आणि शुक्रवारी संघातील सदस्यांना दुसरा डोस देण्याचे प्लॅनिंग करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर भारतीय संघ ब्रेकवर आहे. आगामी कसोटी मालिकेच्यापूर्वी भारतीय संघाला 14 जुलैपासून डरहम येथे क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

हेही वाचा: ICC ODI Rankings : पुन्हा आपल्या मितूचा ऋतू!

20 ते 22 दरम्यान सराव सामन्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. यासाठी भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाने इंग्लंड आणि वेल्स बोर्डाला विनंती केली होती. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्याशिवाय ईशांत शर्मालाही दुखापतीला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या हाताला टाके पडले असून 4 ऑगस्टपासून रंगणाऱ्या कसोटी सामन्यापर्यंत तो रिकव्हर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Corona : स्टोक्स कॅप्टन; पाक विरुद्ध इंग्लंडचा नवा संघ

न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव विसरुन इंग्लंड विरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीला लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी हा आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. त्यामुळे मालिकेत दमदार कामगिरी करुन आपली दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

loading image