esakal | ICC ODI Rankings : मितू पुन्हा एकदा टॉपर!
sakal

बोलून बातमी शोधा

Mithali Raj

ICC ODI Rankings : मितू पुन्हा एकदा टॉपर!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड दौऱ्यावर विक्रमावर-विक्रम करणाऱ्या मिताली राज वनडेतील अव्वल फलंदाज ठरलीये. ICC ODI Rankings मध्ये मितालीने पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे. आयसीसीने मंगळवारी महिला वनडे रँकिंग जारी केली. यात मितालीने चार स्थानांनी झेप घेत पहिल्या स्थानावर विराजमान झालीये. मितालीच्या 762 रेटिंगसह टॉपला पोहचलीये. (Mithali Raj Reclaims Number One Spot In ICC Odi Rankings)

यापूर्वी फेब्रुवारी 2018 मध्येही ती अव्वलस्थानी होती. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज 2005 मध्ये पहिल्यांदा आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉपला पोहचली होती. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत मितालीने दमदार कामगिरी केली. पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात तिने 72 आणि 59 धावांची खेळी केली होती. तिच्या अर्धशतकानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत सलग तिसरे अर्धशतक झळकावत तिने नाबाद 75 धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा: Corona : स्टोक्स कॅप्टन; पाक विरुद्ध इंग्लंडचा नवा संघ

मिताली शिवाय भारताची सलामीची फलंदाजज स्मृती मानधना अव्वल दहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. 708 रेटिंगसह स्मृती मानधना नवव्या स्थानी आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आयसीसी रँकिंगमध्ये नवोदित फलंदाज शफाली वर्मा हिला देखील फायदा झाला. 49 स्थांनाच्या सुधारणेसह शफाली वर्मा 71 क्रमांकावर पोहचलीये.

हेही वाचा: स्मृती मानधनाचा ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी चार स्थानांनी सुधारणा करत 53 व्या स्थानावर आहे. अष्टपैलू दीप्ति शर्माला एका स्थानाचा फायदा झाला असून ती 12 व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची सलामीची फलंदाज लॉरेन विनफील्ड हिल 14 स्थानांनी झेप घेत के फायदे से 41 व्या क्रमांकावर पोहचलीये.

loading image