esakal | CPL 2021 : पोलार्डचा संघ आउट; वजनदार माणसाच्या संघान गाठली फायनल!
sakal

बोलून बातमी शोधा

TKRvSLK

CPL 2021 : पोलार्डचा संघ आउट; वजनदार माणसाच्या संघान गाठली फायनल!

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेट जगतातील वजनदार माणूस रहकिम कॉर्नवालच्या सेंट लुसिया किंग्जने केरॉन पोलार्डच्या ट्रिनबॅको नाईट रायडर्सला पराभूत करत कॅरेबियन लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मार्क डायलच्या धमाकेदार खेळीनंतर डेविड विसेनं केलेल्या भेदक माऱ्यासमोर केरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. रहकिम कॉर्नवालने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक वजन असलेला तो खेळाडू आहे. त्याचे वजन 100 + आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना सेंट लुसियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात कॉर्नवाल शून्यावर माघारी परताल. त्यानंतर मार्क डायलेनं 78 धावांची धमाकेदार खेळी केली. रोस्टन चेस (36), विसे नाबाद 34 आणि टिम डेविडच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर सेंट लुसिया संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 205 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा संघ 19.3 षटकात 184 धावांत आटोपला.

हेही वाचा: IPL पूर्वी MI च्या ओपनरचा धमाका; आफ्रिकेनं उडवला लंकेचा धुव्वा

डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नाईट रायडर्सची सुरुवात सेंट लुसियापेक्षाही खराब झाली. धावफलकावर अवघ्या 6 धावा असताना लिंडल सिमन्स माघारी फिरला. सुनील नरेन (30), कॉलिन मुन्रो (28), रामदीन (29), डेरेन ब्रावो (25) आणि कर्णधार केरॉन पोलार्ड (26) धावा करुन परतल्यानंतर टिम सेफर्टने 10 धावा केल्या.

हेही वाचा: नवरा-बायकोचं नातं तुटंल; बाप-लेकाचं प्रेम कायम!

सेंट लुसिया संघाकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेविड विसेनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. वहाब रियाझ-किमो पॉल यांनी प्रत्येकी 2-2 तर अल्झारी जोसेफ याने एक विकेट घेतली. गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रिवोट्स यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून यांच्यातील विजेता 15 सप्टेंबर रोजी फायनलसाठी सेंट लुसियाशी भिडेल.

loading image
go to top