esakal | अंपायरवरील नाराजीसाठी पोलार्डचं सोशल डिस्टन्सिंग; व्हिडिओ पाहाच
sakal

बोलून बातमी शोधा

CPL 2021

अंपायरवरील नाराजीसाठी पोलार्डचं सोशल डिस्टन्सिंग; व्हिडिओ पाहाच

sakal_logo
By
सुशांत जाधव

कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League 2021) स्पर्धेत रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात कायरन पोलार्ड ((Kieron Pollard) ) अंपायरच्या निर्णयावर नाखुश दिसला. त्याने मैदानातच आपल्यातील संपात व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. ट्रिनबॅगो नाइट रायडर्स आणि सेंट लुसिया यांच्यातील लढती दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

ट्रिनबॅगो नाइट रायडर्सच्या डावातील 19 व्या षटकात सेंट लुसियाकडून खेळणारा पाकिस्तानी वाहब रियाज (Wahab Riaz) गोलंदाजी करत होता. चार चेंडू फेकण्यापूर्वी त्याने चार वाइड बॉल फेकले होते. पाचवा बॉलही त्याने खूप बाहेर टाकला. मैदानातील अंपायरने तो वाइड दिलाच नाही. यावेळी न्यूझीलंडचा टिम सेफर्ट बॅटिंग करत होता. त्याने बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्नही केला. पण बॉल काही त्याच्या टप्प्यात आला नाही. मैदानातील पंचांनी बॉल योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेल्या पोलार्डने नाराजी व्यक्त केली. रियाजने या षटकात 4 अवांतर धावांसह एक षटकार आणि दोन चौकाराच्या रुपात 21 धावा खर्च केल्या.

हेही वाचा: भारतीय फुटबॉल संघ नेपाळमध्ये

पांचवा बॉल वाइड न दिल्याने पोलार्डने अनोख्या अंदाजात राग व्यक्त केला. पहिल्यांदा त्याने सौम्य भाषेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तो अंपायपासून जवळपास 20 यार्ड दूर जाऊन शॉट मिडविकेटला उभा राहिला. पोलार्डच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

हेही वाचा: ‘मूर्खपणा’ त्सित्सिपासने आदर गमावला

या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना ट्रिनबॅगो नाइट रायडर्सनं 7 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आंद्रे फ्लेचरने 81 धावांची धुवांधार इनिंग खेळली. पण तरही सेंट लुसियाला पराभवाचा सामना करावा लागला. निर्धारित 20 षटकात त्यांना 131 धावांपर्यंतच मजल मारता आली.

loading image
go to top