esakal | भारतीय फुटबॉल संघ नेपाळमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

football

भारतीय फुटबॉल संघ नेपाळमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काठमांडू : नेपाळविरुद्ध मैत्रीपूर्ण फुटबॉल मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ येथे दाखल झाला आहे. २ व ५ सप्टेंबरदरम्यान त्यांच्यात दोन फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत. सध्या दोन्हीही संघ मालदीव येथे १ ते १६ ऑक्टोबरदरम्यान नियोजित असणाऱ्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या अजिंक्यपदासाठी तयारी करत आहेत.

मूळचा नेपाळी असणारा भारतीय कर्णधार सुनील छेत्री या वेळी नेपाळी भाषेत संवाद साधताना म्हणाला की, ‘माझ्या आजोबांचे घर असणाऱ्या या भूमीवर पाऊल ठेवताना प्रचंड अभिमान वाटत आहे. हे सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण नेपाळ ताकदवान फुटबॉल संघ आहे. कोरोना काळात फुटबॉल सामने खेळण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत.’ आगामी अजिंक्यपदाच्या तयारीबाबत प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना, ‘या स्पर्धेत कोरोना महामारीमुळे अनेक वरिष्ठ खेळाडू खेळणार नसल्याचे’ त्याने म्हटले आहे.

loading image
go to top