डिव्हिलिअर्सच्या जबऱ्या फॅनने बघा काय केलंय; सोशल मीडियात फोटो होतोय तुफान व्हायरल!

टीम ई-सकाळ
Monday, 17 February 2020

एबीने २०१८मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. मात्र, तो सध्या व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटपटू एबी डिव्हिलिअर्सचा ३६ वा वाढदिवस आज जगभरात साजरा केला जात आहे. क्रिकेटवेडा देश अशी ओळख असणाऱ्या भारतामध्ये एबीच्या फॅन्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे भारतातही त्याचा बर्थडेही एखाद्या टीम इंडियाच्या स्टार खेळाडूसारखाच सेलिब्रेट केला जात असल्याचे पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'मिस्टर ३६०' अशी उपाधी त्याला त्याच्या जगभरातील चाहत्यांनी बहाल केली आहे. कारण तो क्रिकेट ग्राउंडच्या कोणत्याही भागात बॉल टोलवू शकतो आणि मी पाहिलेला तो एकमेव खेळाडू असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदा म्हटले होते. आयपीएल, टी-२० आणि वनडे या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. जगभरात त्याचे जेवढे चाहते आहेत, त्यापेक्षा जास्त फॅन्स फक्त भारतात आहेत. एबीवरील प्रेमाचे एक ताजे उदाहरण त्याच्या वाढदिवशी दिसून आले. 

- 'माही फॅन्स'साठी गुड न्यूज; थाला 'या' तारखेला उतरणार मैदानात!

दक्षिण भारतात पोंगल सण उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही तो तितक्याच उत्साहात साजरा करण्यात आला. ४ दिवस चालणाऱ्या या सणाच्या तिसऱ्या दिवशी गाय आणि बैलपूजन केले जाते. महाराष्ट्रात बैलपोळ्याला जसे बैलाला सजविण्यात येते, तसेच पोंगललाही सजविण्यात येते. यंदा कर्नाटकमधील एका चाहत्याने आपल्या बैलाच्या पाठीवर एबीच्या नावाची डिझाईन काढली होती. तसेच रॉयल चॅलेंजर बेंगलोर (आरसीबी)चा लोगोही काढला होता. हाच फोटो ट्विटरवर सध्या चर्चेचा विषय ठरत असून एबीच्या अनेक फॅन्सनी तो शेअरही केला आहे. 

- #ABDevilliers:डिव्हिलिअर्सच्या चाहत्यांना गुड न्यूज; 'या' स्पर्धेत करणार 'कम बॅक'

एबी डिव्हिलिअर्स इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी)कडून खेळतो.  फिल्डिंग असो वा बॅटिंग एबीचा ग्राउंडमधील वावर पाहण्यासारखा असतो. त्याच्या बॅटिंगच्या हटक्या स्टाईलमुळे त्याला भारतात मोठा फॅनबेस तयार झाला आहे. त्यामुळेच तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय परदेशी खेळाडू ठरला आहे.

- INDvsNZ : किवींचा हुकमी एक्का परतला; कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

एबीने २०१८मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. मात्र, तो सध्या व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. त्याने ७८ इंटरनॅशनल टी-२०मध्ये १३५.१६ च्या स्ट्राईक रेटने १६७२ रन्स केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १५४ मॅचमध्ये ३९.९५च्या सरासरीने ४३९५ रन्स केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crazy fan of AB de Villiers wishesh him Happy Birthday with some rare photos