esakal | 'माही फॅन्स'साठी गुड न्यूज; थाला 'या' तारखेला उतरणार मैदानात!
sakal

बोलून बातमी शोधा

MSDhoni

गेल्या वर्षी धोनीने फक्त एकदाच नेटमध्ये सराव केला होता. रांचीमध्ये झारखंडच्या रणजी टीमसोबत सराव करतेवेळीचे त्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.

'माही फॅन्स'साठी गुड न्यूज; थाला 'या' तारखेला उतरणार मैदानात!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : टीम इंडियाचा माजी विश्वविजेता कॅप्टन आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी हा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, लवकरच तो क्रिकेटच्या ग्राउंडवर परतणार असल्याने माही फॅन्स कमालीचे आनंदी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे धोनी सरावासाठी लवकरच मैदानात उतरणार असल्याचे संकेत चेन्नई सुपर किंग्जने दिले आहेत. त्यामुळे चेन्नई शहर आपल्या लाडक्या 'थाला'च्या आगमनाच्या कामाला लागले आहे. 

- आश्चर्य:'तो' उसेन बोल्टपेक्षा वेगानं धावतो; 9.55 सेकंदांत गाठले 100 मीटर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी 29 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये दाखल होणार असून 1 मार्चपासून तो आपल्या आगामी मोहिमेला सुरवात करणार आहे. त्याच दिवशी तो चेन्नई टीमबरोबर सरावही करणार आहे. सुरवातीला टीममधील 24 पैकी 15-16 खेळाडू असतील, त्यानंतर बाकीचे खेळाडू हे दोन आठवड्यात टीमशी जोडले जाणार आहेत. यंदा चेन्नईची पहिली मॅच 29 मार्चला मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. त्याअगोदरचे 3-4 सराव सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून चेन्नईच्या फॅन्सना ते पाहता येणार आहेत. 

- 'व्हॅलेन्टाइन डे'ला सचिनने जगजाहीर केलं त्याचं पहिले प्रेम!

दरम्यान, गेल्यावर्षी 10 जुलैला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने एकही इंटरनॅशनल क्रिकेट मॅच खेळली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळले. परिणामी, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला होता. पण याबाबत बीसीसीआय, टीम इंडियातील खेळाडू आणि धोनीच्या मित्रमंडळींपैकी कोणीही काहीही बोलले नाही. मात्र, तो आयपीएल खेळणार हे नक्की झाले होते. त्यामुळे आयपीएलच्या कामगिरीवर त्याचे टीम इंडियातील कमबॅकही ठरणार आहे.

- भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील एका कार्यक्रमाप्रसंगी स्वत: धोनीने 'जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका,' असे म्हटले होते. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे धोनी येत्या टी-20 वर्ल्डकपमध्येही तो दिसू शकतो. धोनीलाही त्याची कल्पना आहे.

गेल्या वर्षी धोनीने फक्त एकदाच नेटमध्ये सराव केला होता. रांचीमध्ये झारखंडच्या रणजी टीमसोबत सराव करतेवेळीचे त्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. आताही धोनी सुमारे एक महिना सराव करून आयपीएलमध्ये उतरणार आहे. त्यामुळे माही फॅन्सचे त्याच्याकडे लक्ष लागून राहिले आहे.