esakal | भारताच्या कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची मदत, केली इतक्या लाख रुपयांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं केली भारताला मदत

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं केली भारताला मदत

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या लढत्यात भारताला जगभरात मदत केली जात आहे. यामध्ये आता ऑस्ट्रेलियनं क्रिकेट बोर्डानेही मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना टेस्ट आणि ऑक्सिजनसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मदत जाहीर केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर्स असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलिया भारतातील कोरोनाच्या लढ्यासाठी मदतीला सरसावले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं प्रारंभिक रुपात 5 हजार डॉलर म्हणजेच 37 लाख रुपयांची मदत केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांना प्रोत्साहित करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम सीईओ निक हॉकले म्हणाले की, "ऑस्ट्रेलियन आणि भारतीयांचं एक वेगळं नात आहेय क्रिकेटमुळे दोन्ही देश जोडले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही भारतासोबत आहोत. शक्य तितकी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. येथील लोकांच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत."

हेही वाचा: कोरोनाला हरवायचे आहे? या योगाभ्यासाची होईल मदत

हेही वाचा: भारतावरील संकटाने ब्रेट ली गहिवरला; बिटकॉईनच्या रुपात केली मोठी मदत

पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांनी भारताला मदत करत सर्वांची मनं जिंकली होती. पॅट कमिन्सनं 37 लाखांची मदत केली होती. ब्रेटलीनं 40 लाखांची मदत केली होती. राजस्थान रॉयल्सनं 7.5 कोटी रुपयांची मदत दिली.

loading image