दादागिरीचा पुरावा काय? गांगुलींनी सोडलं मौन

Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues
Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues esakal

भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विराट कोहलीसोबतचे मतभेदानंतर निवड समितीच्या निर्णयातील ढवळाढवल यामुळे गांगुली चर्चेत आहेत. यासंदर्भात सौरव गांगुली यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे.

बीसीसीआय निवड समितीच्या (BCCI Selection Committee) बैठकीला उपस्थिती राहून संघ निवडीत हस्तक्षेप करतात, असा आरोप सौरव गांगुली यांच्यावर (Sourav Ganguly) होत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्याच्या घडीला ज्या अफवा पसरल्या आहेत त्यावर मला काही बोलायचे नाही. जे आरोप झाले आहेत त्याचा कोणताही पुरावा नाही. आधाराशिवाय होणाऱ्या आरोपावर उत्तर देण्यात काहीच अर्थ नाही. मी बोर्डाचा अध्यक्ष आहे. माझ्यावर जी जबाबदारी आहे तेच काम मी करत आहे.

गांगुली पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात मी BCCI निवड समितीच्या बैठकीत हजर असल्याचे बोलले जात आहे. जो फोटो व्हायरल होतोय ती निवड समितीची बैठकच नव्हती. या फोटोत माझ्याशिवाय जय शाह, विराट कोहली आणि बीसीसीआय संयुक्त सचिव जयेश जॉर्ज देखील दिसत आहेत. जयेश निवड समितीचे सदस्य नाहीत.

Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues
ठरलं! ऑस्ट्रेलिया 24 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यास 'राजी'

जय शाह यांच्यासोबतच्या नात्यावरही केलं भाष्य

गांगुलींनी जय शाह यांच्यासोबतच्या नात्यावरही भाष्य केले. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. याशिवाय आम्ही सहकाही म्हणून उत्तमरित्या काम करत आहोत. जय, अरुण धूमल आणि जयेश जॉर्ज यांच्यासोबत मिळून कोरोनाच्या संकटात क्रिकेट कसे खेळवायचे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दोन वर्षांच्या काळात आम्हाला चांगले यशही मिळाले, असेही तो म्हणाला.

Sourav Ganguly Big Statement about IPL 2022 venues
हुड्डा म्हणतो, माझे प्राधान्य IPL Auction ला नाही तर 6 फेब्रुवारीला!

कसोटी कर्णधारासंदर्भात काय म्हणाला गांगुली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडलं. त्यानंतर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? हा प्रश्नही चर्चेत आहे. यासंदर्भात गांगुली म्हणाला की, कर्णधार पदासाठी काही मापदंड आहेत. यात जो फिट असेल तो कसोटी संघाचा कर्णधार होईल, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com