Cricket : चंद्रपूरच्या मेहूलचा भीमपराक्रम ; एका डावात दहाच्या दहाही विकेट्स घेण्याचा अनोखा पराक्रम केला

व्हीसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत घेतल्या दहाच्या दहाही विकेट्स
विकेट्स
विकेट्सsakal

नागपूर : चंद्रपूरचा क्रिकेटपटू मेहूल शेगमवारने एका डावात दहाच्या दहाही विकेट्स घेण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. मेहुलने हा भीमपराक्रम विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित खैरागड चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेदरम्यान शुक्रवारी गोंदिया जिल्हा संघाविरुद्ध केला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा मेहूल विदर्भाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

चंद्रपूर येथे खेळल्या गेलेल्या दोनदिवसीय साखळी सामन्याचा पहिला दिवस पावसाने धुतल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गोंदिया संघाची मेहूलने पार दाणादाण उडविली.

त्याच्या भेदक माऱ्यापुढे गोंदियाचा अख्खा डाव १५.१ षटकांत ७६ धावांमध्ये आटोपला. डावखुरा फिरकीपटू असलेल्या मेहूलने ७.१ षटकांत केवळ २२ धावा देत सर्व दहा गडी बाद केले. गोंदियाचा चंद्रकांत द्रुगवार (५७ धावा) हा एकमेव फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला. उल्लेखनीय म्हणजे, गोंदियाचे तब्बल सहा फलंदाज शून्यावरच बाद झालेत.

२५ वर्षीय मेहूलने दुसऱ्याही डावात ६७ धावांमध्ये चार बळी टिपले. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात चंद्रपूर जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळविला. चंद्रपूरने पहिला डाव ९ बाद १५७ धावांवर घोषित केला होता. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मेहूलने ऐतिहासिक, असामान्य व अविश्वसनीय कामगिरीवर आनंद व्यक्त केला.

''सकाळ''शी बोलताना मेहूल म्हणाला, माझ्या हातून असा काही चमत्कार घडेल, अशी अजिबात अपेक्षा केली नव्हती. हा माझ्यासाठी आनंद व अभिमानाचा क्षण आहे. या कामगिरीचा मला भविष्यात नक्कीच फायदा मिळेल. कारण मी गेल्या १६ वर्षांपासून क्लब क्रिकेट खेळत आहे. मात्र अजूनपर्यंत मला व्हीसीएकडून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही. रणजी खेळण्याचे माझे स्वप्न आहे.

क्रिकेट प्रशिक्षक शैलेंद्र भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरविणारा मेहूल हा चंद्रपूरमध्ये युथ क्रिकेट अकादमीकडून स्थानिक सामन्यांमध्ये खेळतो, तर व्हीसीएच्या ‘ए‘ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत तो इंडियन जिमखानाचे प्रतिनिधित्व करतो. मायनिंग इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेला मेहूल पाचवीत असताना त्याच्या वडिलांचे (वासुदेव शेगमवार) निधन झाले होते.

घरचा आधारवड गेल्यानंतर आईने (रंजना शेगमवार) घरोघरी स्वयंपाकाचे करून मेहूल व त्याच्या दोन बहिणीचे पालनपोषण केले. चंद्रपूर शहरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांनी मेहूलला आर्थिक मदत करून त्याच्या करिअरला दिशा देण्याचे काम केले.

आतापर्यंत तिघेच ''दस नंबरी''

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तिघांनाच दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करता आला. यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिम लेकर, भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळे आणि न्यूझीलंडचा एजाज पटेल यांचा समावेश आहे. या तिघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली. प्रथम श्रेणी किंवा स्थानिक पातळीवरील सामन्यात असा विक्रम आतापर्यंत कुणालाच करता आला नाही. जगातील या मोजक्या क्रिकेटपटूंच्या पंक्तीत आता विदर्भाचा मेहुलही जाऊन बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com