VIDEO : दोन षटकार खाल्यावर पाक गोलंदाजाने रसेलला केले जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

andre russell

VIDEO : दोन षटकार खाल्यावर पाक गोलंदाजाने रसेलला केले जखमी

PSL-2021 : कॅरेबियन संघातील स्टार खेळाडू वेगवेगळ्या फ्रेंचायझी लीगमध्ये आपल्या फटकेबाजीचा नजराणा पेश करत असतो. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसलेला मसल पॉवर आंद्रे रसेल सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. पीएसलमधील एका सामन्यात आंद्रे रसेलला स्टेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले. फलंदाजी करत असताना एक बाउन्सर त्याच्या डोक्यावर येऊन आदळला आणि तो दुखापतग्रस्त झाला. त्याला स्टेचरवरुन मैदानातून ड्रेसिंगरुमकडे नेण्यात आले.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रसेलला इस्लामाबाद यूनायटेड विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. 20 वर्षीय पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद मूसाच्या बाउन्सर रसेलला चुकवता आला नाही. मूसाने तावातावाने मारलेला बाउन्सर चेंडू थेट रसेलच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू लागल्यानंतर रसेल मैदानात कोसळल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात क्वेटा ग्लेडिएटर्सच्या डावातील 14 व्या षटकात हा सर्व प्रकार घडला. रसेलने युवा गोलंदाज मूसाच्या त्या षटकात 2 षटकार खेचले. त्यानंतर बाउन्सर टाकत मूसाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी रसेलला चेंडू लागला. रसेलने 6 चेंडूत 13 धावा केल्या. हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर फिजिओ ट्रिटमेंटनंतर रसेल बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. तो कॅच आऊट झाला.  

हेही वाचा: क्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल

रसेल फिल्डिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. नसीम शाह त्याच्या जागी फिल्डिंगसाठी मैदानात उतरला होता. कन्कशन सब्स्टीट्यूट नियमानुसार एका खेळाडूच्या जागी टीममधील दुसऱ्या खेळाडूला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरता येते. रसेलच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा बॅटिंग करताना क्वेटा ग्लेडिएटर्सने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या होत्या. इस्लामाबाद यूनायटेडने 10 ओव्हर्समध्ये सामना संपवला.

हेही वाचा: Video : अंपायरसमोर स्टंटबाजी! क्रिकेटरवर झाली कारवाई

Web Title: Cricket Cricket News International Andre Russell Psl 2021 Watch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..