Ind Vs Aus T20:आता ‘टी-२०’ विश्‍वकरंडकाची तयारी ! 'सूर्य'सेना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात, 'या' वेळी सुरु होणार सामना

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा धुरळा खाली बसत नाही, तोच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.
Ind Vs Aus T20:आता ‘टी-२०’ विश्‍वकरंडकाची तयारी ! 'सूर्य'सेना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात, 'या' वेळी सुरु होणार सामना

India Vs Australia 1st T20 Match: एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा धुरळा खाली बसत नाही, तोच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या काही दिवसांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका होत आहे. त्यातील पहिला सामना उद्या होणार आहे. सूर्यकुमार यादव नेतृत्व करत असलेल्या या मालिकेत नवोदितांची परीक्षा होणार आहे.

‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ ‘ट्वेन्टी-२०’चे ११ सामने खेळणार आहे. त्यातील ही पाच सामन्यांची मालिका आहे. ‘जनरेशन नेक्स्ट’ म्हणून ही मालिका महत्त्वाची आहे.

अहमदाबादमधील अंतिम सामना गमावून जवळपास ९६ तासांतच भारतीय संघ नवी मोहिम सुरू करणार आहे; पण या वेळी शिलेदार बदललेले आहे. अर्थात कर्णधारपदाची जबाबदारी असलेला सूर्यकुमार एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत प्रभावहीन ठरला होता. तो स्वतःसह नवोदित संघाचे मनोधैर्य कसे उंचावणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सूर्यकुमारकडे असलेल्या नव्या जनरेशन नेक्स्टमध्ये यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश शर्मा असे आयपीएल गाजवून प्रकाशझोतात आलेले खेळाडू आहे. ‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेसाठी शर्यतीत राहायचे, असेल तर या सर्वांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे लागणार आहे. अनुभवी ऋतुराज गायकवाड आणि गोलंदाज अर्शदीप यांचीही कसोटी लागणार आहे.

एकीकडे रोहित शर्माचा भारतीय संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करत असताना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली याच शिलेदारांनी चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले होते; पण आता उद्यापासून सुरू होणाऱ्या मालिकेत त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू या मालिकेत खेळणार नसले, तरी ऑस्ट्रेलियाचा संघ काय करू शकतो, हे अहमदाबादमध्ये सर्वांनीच पाहिलेले आहे. शिवाय भारताला डोकेदुखी ठरलेला ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे खेळाडू या मालिकेत खेळणार आहेत. त्यांच्या साथीला मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड हेही आहेत.

लक्ष्मण हंगामी प्रशिक्षक

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसह राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. बीसीसीआयने अजून पुढचा निर्णय घेतलेला नसल्यामुळे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी हंगामी प्रशिक्षक असतील.

सलामीला कोण?

आक्रमक शैलीचा फलंदाज यशस्वी जयस्वालला सलामीवीरासाठी प्रथम प्राधान्य असेल; परंतु त्याच्या साथीला ऋतुराज गायकवाड की इशान किशन कोणाला संधी दिली जाते, हे महत्त्वाचे असेल. यष्टिरक्षक म्हणून इशान की जितेश शर्मा हा प्रश्नही संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे.

सूर्यकुमारवर मदार

भरवशाचा आक्रमक फलंदाज म्हणून सूर्यकुमारला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर प्रत्येक सामन्यात खेळवण्यात आले होते; परंतु त्याने साफ निराशा केली. आता त्याच्यासाठी हुकमी समजल्या जाणाऱ्या ट्वेन्टी-२० प्रकारात तरी तो प्रभाव पाडणार का, हे महत्त्वाचे आहे.

संघ यातून निवडणार

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकून सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान मुकेश कुमार (श्रेयस अय्यर अखेरच्या दोन सामन्यांसाठी)

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्देई, जेसन बेहर्नड्रॉफ, सिन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जॉस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.

सामन्याची वेळ: सायंकाळी ७ पासून

थेट प्रक्षेपण ः जिओ सिनेमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com