esakal | VIDEO : तुमच्यासाठी कायपण! ऑलिम्पिकपटूंसाठी सचिनचा खास संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

VIDEO : तुमच्यासाठी कायपण! ऑलिम्पिकपटूंसाठी सचिनचा खास संदेश

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2021 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला 23 जुलैपासून प्रारंभ होतोय. या स्पर्धेत देशाची मान अभिमानानं उंचावण्याच्या इराद्याने देशातून शंभरहून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) खास व्हिडिओ पोस्ट शेअर केलीये. (Cricket Legend Sachin Tendulkar Message To Indian Players For The Tokyo Olympics Watch Video)

जगातील मानाच्या स्पर्धेत जाणारा प्रत्येक खेळाडू देशाची शान आहे. देशवासियांनी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याची ही वेळ आहे, असे आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून केले आहे. सचिनने या व्हिडिओत म्हटलंय की, विजय आणि पराभव यातील अंतर खूपच कमी असते. परंतु खेळाडू यासाठी वर्षांनुवर्ष मेहनत घेत असतात. ऑलिम्पिकमध्ये खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. खेळाडूंच्या कठोर मेहनतीला सलाम. 'लेट्स चीयर इंडिया'. तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून या पोस्टला चांगली पसंती मिळताना दिसते.

हेही वाचा: VIDEO : फर्स्ट क्लास अँडरसनची हजारी!

तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करताना याला खास कॅप्शनही दिले आहे. ज्यावेळी तुम्ही तिरंगा घेऊन देशाचे प्रतिनिधीत्व करता त्यावेळी प्रत्येक देशवासियाला तुमचा अभिमान वाटतो. यावेळीचे ऑलिम्पिकही असेच असेल. प्रत्येक भारतीय इथूनच तुम्हाला प्रोत्साहन देईल. आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा आशयाची पोस्ट सचिनने आपल्या ट्विटरवर लिहिली आहे.

हेही वाचा: ICC ODI Rankings : मितू पुन्हा एकदा टॉपर!

यंदाच्या वर्षी सहा वेळची विश्व चॅम्पियन आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कॉम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग ऑलिम्पिक उद्घाटन समारोहामध्ये भारतीय ताफ्याचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने या दोघांशिवाय समारोपाच्या कार्यक्रमात कुस्तीपटू बजरंग पुनियाची ध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली आहे.

23 जुलै रोजी पहिल्यांदाच भारताकडून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांच्या रुपात दोन ध्वजवाहक देशाचे प्रतिनिधत्व करताना दिसतील. या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून भारत जगाला स्त्री-पुरुष समानतेचा अनोखा संदेश देताना दिसेल. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी बजरंग पुनिया समारोपाच्या कार्यक्रमात ध्वजवाहकाच्या भूमिकेत दिसेल.

loading image