esakal | VIDEO : फर्स्ट क्लास अँडरसनची हजारी!
sakal

बोलून बातमी शोधा

James Anderson

VIDEO : फर्स्ट क्लास अँडरसनची हजारी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. सोमवारी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 विकेट घेण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. 38 वर्षीय जलदगती गोलंदाजाने काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत लंकाशायरकडून खेळताना केंट विरुद्धच्या सामन्यात मैलाचा टप्पा गाठला. या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या. (James Anderson Record 1000 First Class Wickets Watch Video)

जवळपास 16 वर्षांच्या अंतरानंतर एखाद्या जलदगती गोलंदाजाने प्रथम श्रेणीत 1000 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी 2005 मध्ये अँडी कॅडिक याने प्रथम श्रेणीत हजारी पूर्ण केली होती. केंट विरुद्धच्या सामन्यात अँडरसनने 10 षटकात 19 धावा खर्च करुन 7 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा: इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचा दुसऱ्या डोसचा प्लॅन ठरला!

आयसीसीने खास पोस्ट शेअर करत त्याच्या कामगिरीची दखल घेतली आहे. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अँडरसनच्या 1000 व्या विकेटचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज अँडरसनने आतापर्यंत 262 प्रथम श्रेणी सामन्यात 51 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: ICC ODI Rankings : मितू पुन्हा एकदा टॉपर!

38 व्या वर्षातही त्याच्या गोलंदाजीत कमालीची धार दिसते. त्याने 2002 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यानंतर 2003 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटलाही सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये त्याच्या खात्यात 617 विकेट आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांच्या यादीत देखील तोच अव्वल आहे. सध्याच्या घडीला कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन (800) अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन शेन वॉर्न (708) आणि अनिल कुंबळे (619) यांचा नंबर येतो. भारता विरुद्धच्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन कुबळेंचा विक्रम मागे टाकू शकतो.

loading image