विदर्भाच्या गुरबानीने हॅट्ट्रिकसह घेतल्या चार विकेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

गुरबानीने 101व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विकास मिश्राची दांडा उडविली. सहाव्या चेंडूवर त्याने नवदीप सैनीचा त्रिफळा उडविला. त्यानंतर 103व्या षटकात त्याने पहिल्याच चेंडूवर शतकवीर ध्रुव शोरीची दांडी गुल केली. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर त्याने कुलवंत खेज्रोलियाचा त्रिफळा उडवित दिल्लीचा डाव 295 धावांवर संपविला.

इंदूर : रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाच्या रजनीश गुरबानीचा दिल्लीला हॅट्ट्रिक घेत हादरा दिला. गुरबानी रणजी करंडक अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी 1972-73 मध्ये तमिळनाडूच्या बी. कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हा पराक्रम केला होता. गुरबानीने शेवटच्या चार विकेट टिपल्या. गुरबानीने 101व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विकास मिश्राची दांडा उडविली. सहाव्या चेंडूवर त्याने नवदीप सैनीचा त्रिफळा उडविला. त्यानंतर 103व्या षटकात त्याने पहिल्याच चेंडूवर शतकवीर ध्रुव शोरीची दांडी गुल केली. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर त्याने कुलवंत खेज्रोलियाचा त्रिफळा उडवित दिल्लीचा डाव 295 धावांवर संपविला. अशाप्रकारे त्याने हॅट्ट्रिकसह चार वेळा क्लीन-बोल्डची सनसनाटी कामगिरी केली.

Web Title: cricket news Rajneesh Gurbani becomes 2nd bowler to take hat trick in Ranji final