NZ vs BAN : किवींनी व्याजसह वसुली करायचं ठरवलंय!

NZ vs BAN
NZ vs BANSakal

ख्राइस्टचर्च: न्यूझीलंड (New Zealand) आणि बांगलादेश यांच्यात (Bangladesh National Cricket Team) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सुरु आहे. ख्राइस्टचर्च (Christchurch) च्या हेगले ओवल (Hagley Oval) मैदानात बांगलादेशने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना डोंगराऐवढी धावसंख्या रचली आहे. कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) 373 चेंडूत 252 धावा केल्या. यात त्याने 34 चौकार आणि दोन षटकार खेचले. लॅथमशिवाय 30 वर्षीय फलंदाज ड्वेन कॉन्वेनही (Devon Conway) 166 चेंडूत 109 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 12 चौकार आणि और एक षटकार लगावला.

NZ vs BAN
जोकोविचला न्यायालयाचा दिलासा, हॉटेलमधून बाहेर येण्यास परवानगी

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात विल यंग आणि विकेटकीपर बॅटर टॉम ब्लंडेल यांनी अर्धशतके झळकावली. यंगने पहल्या डावात 54 तर ब्लंडेलने 60 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. रॉस टेलरने 39 चेंडूत 28, हेन्री निकोलसला खातेही उघडता आले नाही. डॅरेल मिशेलने 11 चेंडूत 3 कायले जेमिसनने 11 चेंड़ूच नाबाद 4 धावा केल्या. न्यूझीलंडने 6 बाद 521 धावांवर आपला पहिला डाव घोषीत केला. बांगलादेशने पहिल्या डावात इबादत हुसैन आणि शोरफुल इस्लाम सर्वाधिक दोन-दोन विकेट घेतल्या.

NZ vs BAN
बुद्धिबळ पटावरचा नवा राजा; भरत सुब्रमण्यम भारताचा 73 वा Grandmaster

दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशला त्यांनी 121 धावात गुंडाळले आहे. बांगलादेशचा संघ तब्बल 395 धावांनी पिछाडीवर आहे. यासीर अली (Yasir Ali) 55 (95) आणि नुरल हसन (Nurul Hasan) 45 (62) धावा वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून बोल्टनं (Trent Boult) 43 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. साउदीला (Tim Southee) 3 आणि कायले जमिनसन (Kyle Jamieson) याला दोन विकेट मिळाल्या. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशनं न्यूझीलंडला घरच्या मैदानावर 8 विकेट्सनी पराभूत केले होते. या पराभवाची व्याजासह परतफेड करायचं ठरवूनच न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरल्याचे दिसते. ही कसोटी जिंकून त्यांना मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com