रवी शास्त्री झाले मालामाल; मानधनात तब्बल 'एवढी' वाढ

टीम ई-सकाळ
Monday, 9 September 2019

मुंबई : अनेकांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर अखेर टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून, रवी शास्त्री यांनाच कायम ठेवण्यात आले. शास्त्री यांचा करार २०२१च्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत असणार आहे. याकाळातील त्यांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : अनेकांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर अखेर टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून, रवी शास्त्री यांनाच कायम ठेवण्यात आले. शास्त्री यांचा करार २०२१च्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत असणार आहे. याकाळातील त्यांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Ashes 2010: ऑस्ट्रेलियाने ‘अॅशेस’ राखल्या

शास्त्रींची नाट्यमय निवड
टीम इंडियाच्या कोचची निवड यंदा नाट्यमयरित्या झाली. टीम इंडियाच्या कोचसाठी महेला जयवर्धने, माईक हेसन, टॉम मूडी, लालचंद रजपूत, फिल सिमन्स, रॉबिन सिंग या सगळ्यांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर अखेर रवी शास्त्री यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले. यासाठी कॅप्टन विराट कोहलीने आग्रह धरला होता, अशी माहिती आहे. एका पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा खेळायला आवडेल, असं मत विराटनं एका पत्रकार परिषदेत व्यक्तही केलं होतं. मुळात शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा करार वर्ल्ड कपपर्यंतच होता. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफला ४५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आणि त्यानंतर या दौऱ्याच्या काळातच शास्त्री यांना कोचपदी कायम ठेवण्यात आले. यात बॅटिंग कोच संजय बांगर यांच्यावर गच्छंतीची नामुष्की ओढवली. तर, बोलिंग कोच भारत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने या निवडीबाबत निर्णय घेतला.

राजकारणापाठोपाठ बारामतीत क्रिकेटचाही खेळ रंगणार

शास्त्रींना किती मिळणार मानधन?
या निवडी करताना शास्त्रींसह इतरांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. शास्त्रींना पूर्वी वर्षाला ८ कोटी रुपये मानधन होते. पण, आता त्यांना वर्षाला साडे नऊ ते दहा कोटी रुपये मिळणार आहेत. त्यांच्या मानधनात जवळपास २० टक्के भर पडणार आहे. भारत अरुण आणि आर. श्रीधर यांना वर्षाला साडे तीन तर, विक्रम राठोड यांना वर्षाला अडीच ते तीन कोटी मानधन मिळणार आहे. भारताची पुढची मालिका आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारतात होणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यात तीन टी-२० झाल्यानंतर तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket team india coach ravi shastri got 20 percent hike in remuneration