Cricket World Cup 2023 : अव्वल नंबरी भारत आणि भारतीय खेळाडू; एकदिवसीय क्रमवारीत गिल, सिराज पहिल्या स्थानावर

आयसीसीने एकदिवसीय क्रिकटची ताजी क्रमवारी जाहीर केली.
gill siraj
gill sirajsakal

दुबई - एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आठपैकी आठ सामने जिंकून उपांत्य फेरी अगोदरच निश्चित करणाऱ्या भारतीय संघाला आता आयसीसीच्या रँकिंगमधील अव्वल स्थानाचे कोंदण लाभले आहे. शुभमन गिल फलंदाजीच्या; तर मोहम्मद सिराज गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आले आहेत. भारतीय संघ कसोटी आणि ट्वेन्टी-२० या प्रकारातही अव्वल स्थानावर आहे.

आयसीसीने एकदिवसीय क्रिकटची ताजी क्रमवारी जाहीर केली. त्यात शुभमन गिलने पाक कर्णधार बाबर आझमला; तर सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला मागे टाकून पहिल्या क्रमांक मिळवला.

फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर येणारा गिल भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. याअगोदर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी हा क्रमांक मिळवलेला होता. या विश्वकरंडक स्पर्धेत गिलने श्रीलंकेविरुद्ध शानदार ९२ धावांची खेळी साकार केली होती. सहा सामन्यांत मिळून त्याने एकूण २१९ धावा केल्या आहेत. बाबर आझमने २८२ धावा केल्या असल्या, तरी तो आठ सामने खेळला आहे. त्याची सहा रेटिंग गुणांनी घसरण झाली. बाबर जवळपास दोन वर्षे अव्वल स्थानावर कायम होता.

gill siraj
World Cup 2023 : मॅक्सवेलच नाही तर कपिल देव, इंझमामनेही केली होती क्रिकेटमध्ये अविश्वसनीय खेळी

४९ वे एकदिवसीय शतक करणाऱ्या विराट कोहलीने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे; तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. कोहलीने या विश्वकरंडक स्पर्धेत आठ सामन्यांतून ५४३ धावा केल्या आहेत. दोन शतके आणि चार अर्धशतके करताना त्याची सरासरी १०८.६० अशी आहे.

gill siraj
World Cup 2023:मॅक्सवेल एकटा अफगाणिस्तानला नडला; 'ही' चूक अफगणिस्तानला ४ वर्ष लक्षात राहील

गोलंदाजीच्या क्रमवारीत मोहम्मद सिराजने पुन्हा अव्वल स्थान मिळवले. या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने आठ सामन्यातून १० विकेट मिळवल्या आहेत. जसप्रीत बुमराने तीन स्थानाची प्रगती करत आठवे, तर मोहम्मद शमीने सात स्थानाची झेप घेतली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com