T20 WC Video : शहजादचा 'सुपरकॅच'! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmed-Shehzad-Catch

AFG vs SCO : तुम्ही पाहिलात का हा झेल?

T20 WC: शहजादचा 'सुपरकॅच'! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्..

T20 World Cup 2021, Afghanistan vs Scotland : शारजाच्या मैदानात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने दणकेबाज विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत १९० धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकात अवघ्या ६० धावांत गारद झाला आणि अफगाणिस्तानने १३० धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने पाच तर राशिद खानने ४ गडी बाद केले. मात्र, नावीन उल हक याच्या गोलंदाजीवर अहमद शहजादने टिपलेल्या कॅचची जास्त चर्चा रंगली.

हेही वाचा: T20 WC: "हे खरंच धक्कादायक"; सेहवागकडून चाहत्यांची खरडपट्टी

आफगाणिस्तानकडून नजिबुल्ला झादरान धडाकेबाज अर्धशतक (५९) ठोकलं. रेहमतुल्ला गुरबाझ (४६) आणि हझरतुल्ला झझाई (४४) यांनी छोटेखानी खेळी करत संघाला १९० धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानंतर आफगाणिस्तानच्या संघाने गोलंदाजीला सुरूवात केली. स्कॉटलंडचा संघ ३ बाद ३० या धावसंख्येवर असताना नावीन उल हकने मॅथ्यू क्रॉसला पहिल्या चेंडूवर झेलबाद केले. अहमद शहजादने त्याचा हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या झेलाचे कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा: T20 WC: मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्या फॅन्सना सचिनने सुनावलं

अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर विजय

अफगाणिस्तान : २० षटकांत ४ बाद १९० - नजिबुल्ला झादरान ५९, रेहमतुल्ला गुरबाझ ४६, हझरतुल्ला झझाई ४४, सेफियान शरिफ ३३-२

स्कॉटलंड १०.२ षटकांत सर्वबाद ६० - जॉर्ज मुन्से २५, मुजीब उर रहिम २०-५, रशीद खान ९-४

Web Title: Ahmed Shehzad Takes Super Catch Of Scotland Batter Against Afghanistan In T20 Wc 2021 Watch Video Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top