Hardik Pandya : आता कोणी हार्दिकला ट्रोल करून दाखवाच.... भारताच्या माजी क्रिकेटपटूनं भारला सज्जड दम

Hardik Pandya T20 World Cup 2024 : अंबाती रायुडूने हार्दिक पांड्याचे तोंडभरून कौतुक केलं. त्यानं ट्रोलर्सना इशारा देखील दिला.
Hardik Pandya
Hardik Pandya T20 World Cup 2024esakal

Ambati Rayudu Criticize Hardik Pandya Trollers : टी-20 वर्ल्ड कपच्या आधी आठवडाभर आयपीएलचा हंगाम सुरू होता. त्यादरम्यान ऑलराऊडर हार्दिक मात्र चांगलाच ट्रोल झाला होता. मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दिकला मिळालं होतं आणि रोहित शर्मा त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता. तरी तो टी-20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये एखाद्या हिऱ्सायारखा चमकला, कारण त्याची शेवटच्या क्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ह्याच मुद्द्याला अनुसरून माजी खेळाडू अंबाती रायडू म्हणाला, आता कोणी हार्दिकला ट्रोल करून दाखवाच !

Hardik Pandya
IND vs PAK Champions Trophy: लाहोरमध्ये पुन्हा होणार गदर... तारीख, दिवस ठरला! टीम इंडिया उखडणार पाकिस्तानची स्टम्प

हार्दिकने त्याची शेवटची ओवर टाकली, ज्यामध्ये 15 धावांचा बचाव करावा लागला, जर 16 धावा दक्षिण अफ्रिका करण्यात यशस्वी झाली असती तर हार्दिक भारतातील सर्वात मोठा खलनायक ठरला असता, पण असे न होता तो आता हीरो ठरला आहे. "माझा श्रद्धेवर विश्वास आहे. खूप काही लोकांकडून काय - काय म्हटलं गेलं, पण एक व्यक्ती म्हणून मला ते एक टक्कादेखील खरं वाटलं नाही. लोकं म्हणतात; काही अडचणी नसतात, परंतु मी जिवनात फक्त कधी कोणाला बोलून दाखवायचं नाही तर आपल्या कृतीतून घडवून आणायचं ह्यावर जोर दिला. अडचणी दररोज नसतात, तुम्ही जिंका नाहीतर हारा पण विनम्र राहणं गरजेचं आहे.”

त्याच वेळी, अंतिम सामन्यानंतर अंबाती रायडूने हार्दिक पांड्याचे कौतुक केले आणि स्टार स्पोर्ट्सवर म्हटले, "मला वाटते की त्याच्याकडून ही खूप चांगली कामगिरी झाली आहे. आता मी कोणालाही आव्हान देईल की इतकी मोठी मानसिक ताकद असणाऱ्या व्यक्तीला ट्रोल करून दाखवा. तो श्रेष्ठ आहे मी त्याच्यासोबत माझ्या राज्याच्या टीम मध्ये खेळलोय. तो एक अद्भुत माणूस आहे म्हणूनच तो या वादळातून बाहेर पडू शकला. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या जिवनात आलेल्या वादळातून तो खूप मजबूतपणे बाहेर आला आणि आता तो एक जागतिक विजेता आहे.

Hardik Pandya
U19 Cricket : क्रिकेट संघ की नेपोटिझमचा अड्डा...? 19 वर्षाखालील संघात आजी-माजी खेळाडूंच्या मुलांचा, पुतण्याचा समावेश

तो पुढे म्हणाला, "हार्दिक बराच काळ भारताचा मॅचविनर खेळाडू म्हणून संघात खेळतोय आणि आज त्याने ते पुन्हा सिद्ध केलंय. क्लासेनची विकेट घेऊन पारडं भारताच्या बाजूनं झुकवणं याचं महत्त्व त्याला चांगलंच माहिती होतं. त्याच्यावर खूप अभिमान आहे, त्या भावना बघा. मी तर म्हणतोय की आता कोणीतरी हार्दिकला ट्रोल करुनच दाखवाच. अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याने आक्रमक गोलंदाजी केली, कारण भारताकडे फक्त दोन वेगवान गोलंदाज होते आणि क्लासेनला नियंत्रणात ठेवणं फिरकीपटूंना कठीण जात होते. 14 वे षटकही अर्शदीप सिंगला टाकावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com