T20 WC: बाबरचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोहलीला पुन्हा 'धोबी पछाड' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

babar azam
T20 WC: बाबरचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोहलीला पुन्हा 'धोबी पछाड'

T20 WC: बाबरचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोहलीला पुन्हा 'धोबी पछाड'

T20 World Cup 2021 Pakistan vs Australia, 2nd Semi-Final पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार प्रत्येक सामन्यात नवा विक्रम प्रस्थिपित करत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये पहिल्या विकेटसाठी त्याने मोहम्मद रिझवानच्या साथीनं 71 धावांची भागादारी केली. या सामन्यात त्याला अर्धशतकाला गवसणी घालता आली नसली तरी संघाला दमदार सुरुवात करुन देण्यास त्याची 39 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. डावातील 10 व्या षटकात 34 चेंडूत 39 धावा करुन तो तंबूत परतला. पण बाद होण्यापूर्वी त्याने दोन विश्व विक्रम आपल्या नावे केले.

सर्वाधिक जलद 2500धावा, विराट कोहलीला टाकले मागे

बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद 2500 धावांचा टप्पा पार केलाय. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून त्याने हा पराक्रम आपल्या नावे नोंदवलाय. बाबरने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील 62 व्या डावात 2500 धावांचा टप्पा पार केला. किंग कोहलीने यासाठी 68 वेळा बॅटिंग केली होती. या यादीत विराट कोहली पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर फिंच (78), चौथ्या क्रमांकावर मार्टिन गप्टिल (83) आणि पाचव्या स्थानावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंगचा समावेश आहे.

दुसऱ्या सेमीफायनलमधील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अपडेट्स एका क्लिकवर

टी20 वर्ल्ड कपमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

युएईच्या मैदानात रंगलेला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा बाबरसाठी खास आहे. तो संघाच्या नेतृत्वासह देशाचे प्रतिनिधीत्वही पहिल्यांदाच करतोय. टी-20 वर्ल्ड कपच्या पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. याआधी 2007 मध्ये मॅथ्यू हेडनने 265 धावा केल्या होत्या. बाबरने हा विक्रम मागे टाकलाय. त्याने यंदाच्या स्पर्धेत 6 सामन्यातील 6 डावात 60.60 च्या सरासरीने 126.25 च्या स्ट्राइक रेटनं 303 धावा केल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेत चार अर्धशतकासह सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

बाबर आझमची आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कामगिरी

बाबर आझमने 67 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 62 डावात 10 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने 48.21 च्या सरासरीसह 130.09 च्या स्ट्राइक रेटने 2 हजार 507 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2500 धावा करणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू आहे. यात त्याने एका शतकासह 24 अर्धशतक झळकावली आहेत. 122 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

loading image
go to top