David Warner Wife Tweet | वॉर्नरच्या पत्नीचे तीन शब्द... ट्रोलर्सची केली बोलती बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David-Warner-Wife

वॉर्नरची पत्नी कँडिस हिने मोजक्या शब्दात केलं ट्वीट

वॉर्नरच्या पत्नीचे तीन शब्द... ट्रोलर्सची केली बोलती बंद!

sakal_logo
By
विराज भागवत

NZ vs AUS, T20 World Cup Final: ऑस्ट्रेलियाने रविवारी न्यूझीलंडला ८ गडी राखून पराभूत केले आणि टी२० विश्वकरंडकावर नाव कोरलं. न्यूझीलंडने कर्णधार विल्यमसनच्या धडाकेबाज ८७ धावांच्या जोरावर २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मिचेल मार्शच्या नाबाद ७७ धावा आणि डेव्हिड वॉर्नरची ५३ धावांची तडाखेबाज खेळी याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ७ चेंडू राखून सामना जिंकला आणि विजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नरवर गेल्या काही काळापासून टीका होत होती, पण त्याच्या कालच्या खेळीचे साऱ्यांनीच कौतुक केले. त्याची पत्नी कँडिस वॉर्नर हिने मोजक्या शब्दात टीकाकारांची बोलती बंद केली.

हेही वाचा: T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्वस्तात बाद झाला. पण डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्टार्क या जोडीने ९२ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम स्थितीत नेले. गेल्या अनेक दिवस लयीत नसणारा डेव्हिड वॉर्नर टी२० विश्वचषक स्पर्धेत मात्र तुफान फॉर्मात असल्याचे आढळलं. फायनलमध्ये डावाला दिशा देताना त्याने ५३ धावांची दमदार खेळी केली. या स्पर्धेत वॉर्नरला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

त्यानंतर त्याची पत्नी कँडिस हिने ट्वीटमध्ये टीकाकार आणि ट्रोलर्स यांनी वापरलेले शब्द वापरत वॉर्नरचे अभिनंदन केले. "फॉर्म हरवलेला फलंदाज, वय झालेला खेळाडू आणि संथ क्रिकेटपटू... अभिनंदन डेव्हिड वॉर्नर", असं मोजक्या शब्दात ट्वीट करत तिने ट्रोलर्सची बोलती बंद केली.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

हेही वाचा: न्यूझीलंड हरलं अन् केन विल्यमसनचा भला मोठा पराक्रम हुकला!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली होती. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने संथगतीने २८ धावा केल्या. इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. पण केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आणि संघाला १७२ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

loading image
go to top