T20 WC: भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका - पाक कर्णधार बाबर | IND vs PAK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND-vs-PAK-Babar-Azam-Virat-Kohli

IND vs PAK : भारताला हरवल्यानंतर पाक कर्णधाराची खेळाडूंना खास विनंती

T20 WC: भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका - पाक कर्णधार

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर पाक कर्णधार बाबर आझम याने आपल्या खेळाडूंना एक खास संदेश देत सूचक इशाराही दिला.

हेही वाचा: T20 WC: शहजादचा 'सुपरकॅच'! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्..

"सहकाऱ्यांनो, भारताविरूद्धचा विजय हा एखाद्या खेळाडूमुळे मिळालेला विजय नसून सांघिक कामगिरीचं यश आहे. आपण संघ म्हणून उत्तम कामगिरी केली. त्याचा आपल्याला परिणाम दिसून आला. त्यामुळे आता त्याच सामन्यात अडकून राहू नका. सुरूवात चांगली झाली आहे. हे एन्जॉय करा, पण भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका. आपल्याला पुढचे सामनेदेखील जिंकायचे आहेत. टी२० वर्ल्ड कप जिंकणं हे आपलं उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे रिलॅक्स राहू नका. प्रत्येकाने संघ विजयी करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करा. डोक्यात हवा जाऊन देऊ नका", असा संदेश पाकिस्तान कर्णधार बाबरने आपल्या खेळाडूंना दिला.

हेही वाचा: T20 WC: भारताच्या पराभवानंतर आमिरने उडवली हरभजनची खिल्ली

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही पाकिस्तानचे कौतुक केले. "पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. तुम्ही चांगला खेळ केलात. यालाच म्हणतात लोकप्रिय आणि बड्या संघांना दणका देणं... अप्रतिम फलंदाजी... झक्कास!", असं ट्वीट त्याने केलं. वॉनने कर्णधार बाबर आझम याचेही कौतुक केलं. बाबर आझम हा सध्याच्या घडीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे, असं मायकल वॉन म्हणाला. भारताविरूद्ध बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Do Not Get Overexcited After Beating Team India Says Pakistan Captain Babar Azam To Teammates Ind Vs Pak T20 Wc 2021 Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top