T20 World Cup: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पंत, दुबे, कुलदीपला संधी नाही, दिग्गजाने निवडला संघ

Harbhajan Singh: भारताच्या माजी क्रिकेटपटूने टी20 वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत.
Team India
Team IndiaSakal

India Playing XI: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपला रविवारी सकाळी 6 वाजताच सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अशातच भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा होत आहे. कोणाला संघात संधी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. अशातच आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्या अंदाजानुसार भारताची टी20 वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.

हरभजनने प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत, शिवम दुबे आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली नाही.

Team India
Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये बोलताना हरभजनने त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने खेळाडूंची निवड करताना फॉर्मचाही विचार केला आहे.

हरभजन म्हणाला, 'माझ्या मतानुसार रोहित शर्मा सलामीला जाईल, त्याच्याबरोबर यशस्वी जैस्वाल असेल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि मग सूर्यकुमार यादव आहे. मग माझ्यामते की संजू सॅमसनला खेळवायला पाहिजे. कारण तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे.'

तसेच हरभजनने गोलंदाजी फळीबद्दल सांगताना कुलदीप ऐवजी युजवेंद्र चहलला अधिक पसंती दिली आहे. कारण तो गोलंदाजी करताना मनगटाचा वापर करतो.

हरभजन म्हणाला, 'हार्दिक पांड्या 6 व्या क्रमांकावर आणि रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर. ते अष्टपैलू आहेत. माझ्यामते युजवेंद्र चहलला खेळवायला पाहिजे आणि अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांना.

Team India
T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

याशिवाय हरभजन असेही म्हणाला की जर खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल नसेल, तर भारतीय संघच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शिवम दुबेला खेळवू शकतात.

त्याचबरोबर हरभजन म्हणाला, जर चेंडू खूप वळत असेल, तर कुलदीप यादवला खेळवायला पाहिजे. जर एका वेगवान गोलंदाजाला कमी करायचे असेल, तर हार्दिकला गोलंदाजी करावी लागेल.

दरम्यान, भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध न्युयॉर्कला होणार आहे.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com