ICC च्या फ्रेममध्ये दिसले विराट-बाबर यांच्यातील प्रेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T 20 World Cup Teams Captain
ICC च्या फ्रेममध्ये दिसले विराट-बाबर यांच्यातील प्रेम

ICC च्या फ्रेममध्ये दिसले विराट-बाबर यांच्यातील प्रेम

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सातव्या हंगामात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने बाजी मारली. न्यूझीलंडच्या संघाला पराभवाचा दणका देत फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप उंचावला. दुबईच्या मैदानातील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीचे वर्णन करताना आयसीसीने खास कॅप्शनसह एक फोटो शेअर केलाय.

स्पर्धेतील सहभागी 16 संघातून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील नवा चॅम्पियन मिळाला, असे आयसीसीने म्हटले आहे. 2007 च्या पहिल्या वहिल्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावले होते. पाकिस्तान (2009) इंग्लंड (2010) वेस्ट इंडीज (2012), श्रीलंका (2014), वेस्ट इंडीज (2016) या पाच संघांनी वर्ल्ड कप जिंकला होता. या यादीत आता ऑस्ट्रेलियाचा समावेश झालाय.

हेही वाचा: ज्याच्या बायकोनं खाल्ल्या शिव्या, त्यानंच ऑस्ट्रेलियाला दाखवले 'अच्छे दिन'

नव्या चॅम्पियन संघाचा रुबाब दाखवण्यासाठी आयसीसीने जो फोटो शेअर केलाय तो कमालीचा क्रिएटिव्ह आहे. यात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच दरबारातील एखाद्या राजाप्रमाणे रुबाबात उभा राहिल्याचे दिसते. त्याच्या थोड्या जवळ अंतरावर केन विल्यमसन उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. दोन रांगेत इतर संघातील कर्णधार एकमेकांकडे बघत उभा आहेत.

हेही वाचा: IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी!

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा वाहणारा विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम एकमेकांकडे पाहताना दिसते. आयसीसीच्या फ्रेममध्ये दोघांच्यातील प्रेम टिपण्याचा एक प्रकारच फोटोतून दिसून येतो. या दोघांशिवाय स्पर्धेत सहभागी संघातील वेस्ट इंडीज कर्णधार पोलार्ड, इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह अन्य कर्णधारही दिसतात.

loading image
go to top