पांड्यानं वाढवलं टेन्शन! भारत-पाक सामन्यानंतर न्यावं लागलं रुग्णालयात

पांड्यानं वाढवलं टेन्शन! भारत-पाक सामन्यानंतर न्यावं लागलं रुग्णालयात
Summary

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने टीम इंडियाला धक्का बसला आहे. तर आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने चिंता वाढवली आहे.

टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिल्यास सामन्यात पाकिस्तानकडून १० विकेटने पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तर आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने चिंता वाढवली आहे. सामन्यानंतर पांड्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. दुखापतीमुळे पांड्या मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्या जागी इशान किशन मैदानात आला होता.

पांड्याला दुखापत झाली असल्याचं समोर आलं असलं तरी ती किती गंभीर आहे हे समजू शकले नाही. त्याचे रिपोर्ट अद्याप समोर आलेले नाहीत. बीसीसीआय़ने म्हटलं की, हार्दिक पांड्याला फलंदाजीवेळी उजव्या हाताच्या खांद्याला दुखापत झाली. त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं आहे. पांड्याने पाकिस्तानविरुद्ध फक्त ११ धावांची खेळी केली होती.

पांड्यानं वाढवलं टेन्शन! भारत-पाक सामन्यानंतर न्यावं लागलं रुग्णालयात
भारताने गुडघे टेकून तर पाकिस्तानने छातीवर हात ठेवून काय संदेश दिला?

भारताचा पुढचा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरोधात आहे. अद्याप यासाठी पाच दिवसांचा कालावधी असला तरी पांड्याची दुखापत कशी आहे यावर तो खेळणार की नाही हे ठरणार आहे. पांड्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. बराच काळ पांड्याने गोलंदाजी केलेली नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या संघात पांड्याला फलंदाज म्हणून संघात घेतलं होतं. हार्दिक पांड्याचा हा टी२० क्रिकेटमधील ५० वा सामना होता. नाणेफेकीनंतर पांड्याने म्हटलं होतं की, तो पाठदुखीने त्रस्त आहे. मात्र आधीपेक्षा आता बरा आहे. पण गोलंदाजी करणार नाही. नॉकआउट मॅचेसच्या वेळी गोलंदाजी करायची इच्छा हार्दिक पांड्याने व्यक्त केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com