

India Suffer Defeat Against South Africa in Super 8 Clash
Esakal
भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६मध्ये सुपर ८ स्टेजच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला. गेल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतानेच दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं. आता सुपर ८ स्टेजमध्ये भारतीय संघाला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टीम इंडियाला डिवचलंय. दक्षिण आफ्रिकेचे ३ गडी २० धावातच बाद झाले होते. त्यानंतर झालेल्या १०० धावांच्या भागिदारीने सामन्याचं चित्र बदललं.