

Do or Die in Chennai: India vs Zimbabwe Super 8 Clash to Decide Semi-Final Fate
esakal
टी-२० विश्वचषक सुपर ८ टप्प्यातील निर्णायक सामना आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या लढतीचा टॉस साडेसहा वाजता होईल. दोन्ही संघांसाठी ही ‘करो या मरो’ची लढाई ठरणार असून, पराभूत होणारा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून लगेच बाहेर पडेल. विजेत्या संघाला मात्र वेस्ट इंडिजच्या आजच्या पहिल्या सामन्याच्या निकालाकडे डोळे लावून बसावे लागेल. वेस्ट इंडिज जिंकल्यास भारतासाठी पुढील गणित बिकट होईल.