Michael Vaughan Tweet Backfire | भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियन खेळाडूनं झापलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaughan-Virat-Kohli

मायकल वॉन कायमच भारतीय संघाला कमी लेखत असतो...

भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियन खेळाडूनं झापलं

T20 World Cup: इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाने त्यांना पराभूत केले. इंग्लंडचा संघ ब गटात खूपच चांगल्या लयीत खेळत होता. ऑस्ट्रेलियाला त्यांनी साखळी सामन्यात सहज धूळ चारली होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला कोणीही हरवू शकणार नाही, असा एक अंदाज अनेकांनी वर्तवला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने टी२० विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अडम झम्पा याने भारतीय संघाला नेहमी नावं ठेवणाऱ्या मायकल वॉनला खोचक शब्दात चांगलंच झापलं.

हेही वाचा: AUS vs NZ T20WC Final : सामन्यातील महत्त्वाचे क्षण एका क्लिकवर...

मायकल वॉनने कायम भारतीय क्रिकेट संघाला नावं ठेवण्यात आघाडीवर असतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ मोठ्या फरकाने पराभूत होईल असं तो म्हणाला होता. पण त्याचा तो अंदाज पूर्णपणे चुकला होता. त्यानंतर आपल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं, "मला असं वाटतं की यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयाची संधी नाही. टी२० विश्वचषकाआधी त्यांनी अनेक मालिकांमध्ये पराभव स्वीकारला आहे. ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी दमदार असल्याने तो कदाचित दमदार खेळ करेल, पण इतर खेळाडूंना फारशी चमक दाखवता येणार नाही. ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा चान्स नाहीच... इंग्लंड, भारत, विंडिज, न्यूझीलंड किंवा कदाचित पाकिस्तान (विजेता ठरू शकतो.)". त्याचे हेच शब्द आपल्या फोटोखाली कॅप्शनला वापरून झम्पाने त्याला झापलं अन् थोडीशी खिल्लीही उडवली.

हेही वाचा: पराभवानंतर न्यूझीलंड खेळाडूच्या दोन शब्दांच्या ट्वीटने खळबळ

दरम्यान, मायकल वॉनने ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेता बनल्यावर अभिनंदनही केलं.

"ऑस्ट्रेलियाने टी२० चॅम्पियन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केलं होतं. त्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिमाखात कमबॅक केलं. मिचेल मार्श हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केल्याचा मला आनंद आहे. येत्या काळात होणाऱ्या Ashes Test Series मध्येही तो चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आहे.

loading image
go to top