ज्याच्या बायकोनं खाल्ल्या शिव्या, त्यानंच ऑस्ट्रेलियाला दाखवले 'अच्छे दिन' |T20 World Cup 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amy Griffiths and Aaron Finch
ज्याच्या बायकोनं खाल्ल्या शिव्या, त्यानंच ऑस्ट्रेलियाला दाखवले 'अच्छे दिन'

ज्याच्या बायकोनं खाल्ल्या शिव्या, त्यानंच ऑस्ट्रेलियाला दाखवले 'अच्छे दिन'

युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान भारत प्रबळ दावेदार होता. पण साखळी फेरीतच त्यांचा पत्ता कट झाला. भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर साखळी फेरीत अपराजित राहिलेला पाकिस्तान आणि आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले गेले. हे दोन्ही संघही सेमीफायनलमध्ये गळपटले. ( गळपटले हा शब्दा बाद झाले या अर्थानं घ्यावा) दुबईच्या मैदानात टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी 2015 मध्ये मेलबर्नमध्ये दिसलेले चित्र पाहायला मिळाले. आणि निकालही अगदी तसाच लागला.

2015 च्या फिफ्टी-फिफ्टी वर्ल्ड कप स्पर्धेत मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना रंगला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हीच पुनरावृत्ती झाली. न्यूझीलंड संघाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. ज्या अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला त्या फिंचला नेटकऱ्यांना आक्षेपार्ह शब्दांत टोमणे मारले होते. एवढेच नाही तर त्याच्या पत्नीलाही धमकावण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला.

फिंच अन् त्याच्या कुटुंबियांवर कधी ओढावलं होत संकट....

न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत फिंचच्या भात्यातून धावा झाल्या नव्हत्या. पहिल्या दोन सामन्यात त्याने अवघ्या 13 धावा केल्या. त्यानंतर फिंचच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. एमी फिंचला विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी अपशब्दांचा मारा केला. तिला शिवीगाळ करत आपल्या नवऱ्याला कॅप्टन्सी सोडायला सांग, असा सल्ला काही नेटकऱ्यांनी दिला होता.

फिंचच्या पत्नीनं दिलं होतं सडेतोड उत्तर...

यावेळी एमी फिंच हिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच यावर सडेतोड उत्तर दिले होते. ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. पण अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. माझा पती धावा करण्यासाठी संघर्ष करतोय हे खरं असलं तरी तो प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करतोय. सोशल मीडियातून आक्षेपार्ह शब्दांत होणारा मारा हे एखाद्या भयावह स्वप्नासारखे आहे. पहिल्यांदाच कुटुंबियांना लोकांनी टार्गेट केल्याचा उल्लेखही एमीनं केला होता.

हेही वाचा: "खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान

फिंचकडे कॅप्टन्सी आली गेली अन् ....

2014 मध्ये पहिल्यांदा फिंचकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या टी-20 संघाची धूरा सोपवण्यात आली. पण त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने तीनही प्रकारातील संघाचे नेतृत्व स्मिथच्या खांद्यावर दिले. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर समीकरणे पुन्हा बदलली. स्मिथने कर्णधारपद गमावले तर वॉर्नरला उप-कर्णधारपद सोडावे लागले. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही संघाची धूरा ही फिंचकडे देण्यात आली. तेव्हापासून सुरु झालेला फिंचच्या नेतृत्वाचा सघर्ष अखेर युएईच्या मैदानात संपला. त्याने आपल्या नेतृत्वात संघाला पहिले वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देत ऑस्ट्रेलियन क्रिकेटला पुन्हा एकदा अच्छे दिन दाखवले.

हेही वाचा: वॉर्नरच्या पत्नीचे तीन शब्द... ट्रोलर्सची केली बोलती बंद!

IPL मध्ये मिळाला नाही भाव...

संघाचे नेतृत्व करत असताना फिंचची कामगिरी ढासळल्याचे पाहायला मिळाले. 2020 च्या आयपीएलमध्ये तो फ्लॉप गेला. परिणामी 2021 च्या हंगामात तो खेळतानाच दिसले नाही. आयपीएलमध्ये कवडी मोलाची किंमत झालेल्या फिंचने आपल्या नेतृत्वाची झलक दाखवत आज संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य पुन्हा एकदा आपल्याकडे वेधून घेतले आहे.

loading image
go to top