T20 WC : पाक विरुद्ध कांगारुंची अखिलाडूवृत्ती, गंभीर-भज्जीनं फटकारले |PAK vs AUS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAKvsAUS
T20 WC : पाक विरुद्ध कांगारुंची अखिलाडूवृत्ती, गंभीर-भज्जीनं फटकारले |PAK vs AUS

पाक विरुद्ध कांगारुंची अखिलाडूवृत्ती, गंभीर-भज्जीनं फटकारले

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतील साखळी फेरीत पाच पैकी पाच सामने जिंकलेल्या पाकिस्तानचा प्रवास सेमी फायनलमध्ये संपुष्टात आला. बाद फेरीतील लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पाच विकेट आणि एक षटक राखून पराभूत करत फायनल गाठली. ऑस्ट्रेलियाचा विजयाचा जल्लोष भारतीय चाहत्यांमध्ये दिसत असला तरी गौतम गंभीरला मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अखिलाडू वृत्ती रुचलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडला असता तरी फिंचच्या संघाबद्दल संवेदनशील भावना निर्माण झाली नसती, असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

गंभीरने वॉर्नरच्या अखिलाडूवृत्तीकडे बोट दाखवत रिकी पाँटिंगला टोला लगावला आहे. वॉर्नरने जे काही केले त्यावर पाँटिंग काही ट्विट करणार आहे का? असा प्रश्न गंभीरने उपस्थितीत केला आहे. डेविड वॉर्नरने डेड बॉलवर षटकार मारला होता. ही गोष्ट गंभीरला चांगलीच खटकल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियाच्या डावातील आठव्या षटकातील मोहम्मद हाफिजच्या गोलंदाजीवर वॉर्नर स्ट्राइकवर असताना नॉन स्ट्राइकवर स्मिथ उभा होता. हाफिजच्या हातून चेंडू सुटला आणि दोन टप्पे घेत चेंडू लेग साइडच्या दिशेन जात होता. वॉर्नरने पिचच्या बाहेर येत या चेंडूवर षटकार खेचला. अंपायरने हा चेंडू नो बॉल घोषीत केला.

हेही वाचा: Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

खिलाडूवृत्तीनुसार, डेविड वॉर्नरने या चेंडूवर प्रहार करायला नको होता. ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी अखिलाडूवृत्ती दाखवली. यावरुन काँमेड्री बॉक्समध्ये बसलेले हरभजन सिंग आणि गौतम गंभीर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या मैदानात रविचंद्रन अश्विनने ज्यावेळी मंकडिंग पद्धतीने बटलरला बाद केले होते. त्यावेळी पाँटिंगने खिलाडूवृत्तीचा मुद्दा उपस्थितीत केला होता. आता वॉर्नरच्या कृत्यावर तो काही ट्विट करणार का? असा खोचक प्रश्न गंभीरने पाँटिंगला विचारला आहे.

गंभीरने जो प्रश्न उपस्थितीत केला त्यावर भज्जीने आपले मत मांडत ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फिरकी घेतली. ऑस्ट्रेलियन खेळाडू आपली चूक कधीच मान्य करत नाहीत. त्यांना केवळ दुसऱ्यांना सल्ले द्यायला आवडते, असा टोला भज्जीने मारल्याचे दिसले.

loading image
go to top