Rohit Sharma: रोहितने रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'हा' पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच क्रिकेटर

T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 3 षटकार खेचत नवा विश्वविक्रम रचला आहे.
Rohit Sharma |  India vs Ireland | T20 World Cup
Rohit Sharma | India vs Ireland | T20 World CupSakal

Rohit Sharma Record: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात बुधवारी न्युयॉर्कला सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय संपादन करत स्पर्धतील मोहिमेला सुरुवात केली आहे.

भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माचेही मोलाचे योगदान राहिले. त्याने या सामन्यात 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यामुळे त्याने मोठा विश्वविक्रमही केला आहे.

रोहितने केला विश्वविक्रम

रोहित शर्माने या खेळीदरम्यान 3 षटकार मारल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत 600 षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही. रोहितने 473 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 499 डावात 600 षटकार पूर्ण केले.

Rohit Sharma |  India vs Ireland | T20 World Cup
Rohit Sharma Video: 'जेव्हा ICC स्पर्धा खेळातो, तेव्हा...', तब्बल नववा टी20 वर्ल्ड कप खेळण्याआधी रोहितने सांगितला अनुभव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. गेलने 483 सामन्यांमधील 551 डावात 553 षटकार मारले आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय षटकार आत्तापर्यंत फक्त रोहित आणि गेल या दोघांनाच मारता आले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 5 जून 2024 पर्यंत)

  • 600 षटकार - रोहित शर्मा (473 सामने)

  • 553 षटकार - ख्रिस गेल (483 सामने)

  • 476 षटकार - शाहिद आफ्रिदी (524 सामने)

  • 398 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम (432 सामने)

  • 383 षटकार - मार्टिन गप्टील (367 सामने)

  • 359 षटकार - एमएस धोनी (538 सामने)

Rohit Sharma |  India vs Ireland | T20 World Cup
Rohit Sharma: रोहितचा टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम; विराट-बाबरच्या पंक्तीत मिळवलं स्थान

टी20 वर्ल्ड कपमध्ये 1000 धावा

रोहितने ही अर्धशतकी खेळी करताना टी20 वर्ल्ड कपमध्येही 1000 धावा पूर्ण केल्या. तो टी20 वर्ल्ड कपमध्ये 1000 धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम विराट कोहली आणि माहेला जयवर्धने यांनी केला आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 5 जून 2024 पर्यंत)

  • 1142 धावा - विराट कोहली (28 सामने)

  • 1016 धावा - माहेला जयवर्धने (31 सामने)

  • 1015 धावा - रोहित शर्मा (40 सामने)

  • 965 धावा - ख्रिस गेल (33 सामने)

  • 897 धावा - तिलकरत्ने दिलशान (35 सामने)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com