Saurabh Netravalkar : पाकला हरवणाऱ्या क्रिकेटरचं पहिलं प्रेम आहे कोडिंग, काय आहे सौरभ नेत्रावळकरची लव्ह स्टोरी?

Saurabh Netravalkar Wife : सौरभच्या पत्नीच्या डान्स प्रोग्रामची शार्क टँकमध्येही झाली होती एन्ट्री.
Saurabh Netravalkar
Saurabh Netravalkar Love Storyesakal

Saurabh Netravalkar Love Story : यंदाचा टी 20 वर्ल्डकपमध्ये युएसएचा संघ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांनी मायदेशात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार सुरूवात केली. याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत एक मोठा उलटफेर केला.

युएसएच्या पाकिस्तानविरूद्धच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा सौरभ नेत्रावळकर एका रात्रीत स्टार झाला. त्यानं सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये त्याने 18 धावा डिफेंड केल्या होत्या.

सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा असून त्यानं भारताकडून 19 वर्षाखालील वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो मुंबईकडून रणजी ट्रॉफी देखील खेळला. त्यामुळं त्याच्याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.

Saurabh Netravalkar
T20 World Cup: वर्ल्ड कप ठरतोय रोमांचक! दोन दिवसात 5 सामन्यांत झाले मोठे उलटफेर

सौरभ नेत्रावळकर हा फक्त क्रिकेट खेळण्यातच तरबेज नाही तर तो अभ्यासात देखील हुशार आहे. त्याने सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलं असून त्याला गोलंदाजीसोबतच कोडिंग करण्यातही खूप मजा येते. याचबरोबर तो गायन आणि वाद्य वाजवण्यात देखील माहीर आहे.

पीटीआयशी बोलताना सौरभ नेत्रावळकर क्रिकेट आणि काम याची सांगड कशी घालतो याबाबत म्हणाला की, 'मला कोणताही दबाव जाणवत नाही. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता त्यावेळी ती गोष्ट तुम्हाला नोकरी वाटत नाही. त्यामुळं ज्यावेळी मी मैदानावर असतो त्यावेळी मला गोलंदाजी करण्यास खूप आवडते. ज्यावेळी मी कोडिंग करतो त्यावेळी मला त्याच्यात देखील आनंदच मिळतो. ते एक काम आहे असं मला वाटातच नाही.'

Saurabh Netravalkar
IND vs PAK New York Weather : भारत-पाकिस्तान सामना होणार रद्द? न्यूयॉर्कमधून मोठी अपडेट आली समोर

कोडिंग आणि क्रिकेट या दोन गोष्टींवर तितकंच प्रेम करणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या आयुष्यात अजून एक प्रेमळ गोष्ट आहे. ती म्हणजे तिची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला! सौरभ आणि स्निग्धा यांनी 20 जानेवारी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांनी दक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं.

नेत्रावळकर हा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. तर त्याची पत्नी स्निग्धा ही प्रसिद्ध कथ्थक नर्तिका आहे. ती युएसएमध्ये अनेक वर्षापासून बॉलिवूड स्टाईल फिटनेस प्रोग्राम देखील चालवते.

देवी स्निग्धा ही लहानपणापासूनच कथ्थक नृत्याकडं आकर्षित झाली होती. ती शाळेत आणि कॉलेजमध्ये कायम डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होत होती. देवी स्निग्धाने पुढे कथ्थकमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं.

Saurabh Netravalkar
Suryakumar Yadav: तुला मानलं भाऊ... जुन्या संघसहकाऱ्याने पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेला जिंकून दिल्यानंतर सुर्याची स्पेशल पोस्ट

देवी स्निग्धा ही बॉली एक्स डान्स फिटनेस प्रोग्राम देखील चालवते. हा प्रोग्राम सॅन फ्रान्सिसको बे एरिया, कॅलिफॉर्निया, युएस येथे हे प्रोग्राम चालतात. बॉली एक्स डान्स फिटनेस प्रोग्राम हा एबीसी च्या शार्क टँकमध्ये देखील फिचर झाला होता. त्यावेळी सर्व परिक्षकांनी कथ्थक नृत्य केलं होतं. देवी स्निग्धा ही या प्रोग्राम गेल्या पाच वर्षापासून चालवत आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com