Suryakumar Yadav: तुला मानलं भाऊ... जुन्या संघसहकाऱ्याने पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेला जिंकून दिल्यानंतर सुर्याची स्पेशल पोस्ट

Saurabh Netravalkar: पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सौरभ नेत्रावळकरसाठी सूर्यकुमार यादवने खास पोस्ट शेअर केली आहे.
Suryakumar Yadav special post for Saurabh Netravalkar
Suryakumar Yadav special post for Saurabh Netravalkar Sakal

Suryakumar post for Saurabh Netravalkar: टी20 वर्ल्ड कपमध्ये 6 जून रोजी डेलासला झालेल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभूत केले. अमेरिकेचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

अमेरिकेच्या या विजयात सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला. त्याच्या कामगिरीनंतर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही खास पोस्ट केली आहे.

सौरभने पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेसाठी गोलंदाजी करताना 19 धावांचा बचाव केला आणि त्याच्या संघाला विजय देखील मिळवून दिला. त्याआधी सामन्यातही त्याने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.

Suryakumar Yadav special post for Saurabh Netravalkar
Saurabh Netravalkar: पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारणाारा सौरभ मुंबईतून कसा पोहचला अमेरिकेत? जाणून घ्या प्रवास

त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्याच्या कामगिरीसाठी सूर्यकुमारने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सुपर ओव्हरमधील क्षणाचा होता. ज्यावेळी सौरभ आनंदाने खाली बसला होता, त्याला भेटण्यासाठी हरमीत सिंग येत होता.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सूर्यकुमारने लिहिले की 'हरमीत पाजी जरा हळू.' तसेच त्याने सौरभसाठी म्हटले की 'तुला मानलं भाऊ. तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी खूप खूश आहे.'

सध्या सूर्यकुमार भारतासाठी आणि सौरभ अमेरिकासाठी खेळत असले, तरी काही वर्षांपूर्वी हे दोघेही मुंबईच्या संघाकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. सौरभचा जन्म मुंबईत झाला असून त्याने क्रिकेटचे धडेही भारतात गिरवले. तसेच तो २०१० साली झालेल्या १९ वर्षांखालील टी२० वर्ल्ड कपमध्येही भारताकडून खेळला.

मात्र, नंतर क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळत नसल्याने आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी सौरभने अमेरिका गाठली. त्याने तिथे त्याचे उच्च शिक्षण घेतले आणि तो तिथेच स्थायिक झाला असून गेल्या काही वर्षापासून अमेरिकेच्या संघाकडून खेळतो.

सौरभनेही मानले आभार

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सौरभचे मोठ्याप्रमाणात कौतुक झाले. या कौतुकाने भारावल्याचे म्हण सौरभनेही सर्वांचे आभार मानले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अमेरिकेचा विजय

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 159 धावा केल्या होत्या. त्यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेनेही 20 षटकात 3 बाद 159 धावाच केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या, पण पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 13 धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com