IND vs PAK : अमेरिका घेत नाही हलक्यात; भारत पाक सामन्यादरम्यान स्नायपर अन् स्वॅट टीम असणार तैनात

T20 World Cup 2024 : अमेरिकेने टी 20 वर्ल्डकप 2024 मधील प्रत्येक सामन्यात सुरक्षेची प्रचंड काळजी घेतली आहे.
IND vs PAK
IND vs PAK T20 World Cup 2024 Securityesakal

IND vs PAK T20 World Cup 2024 Security : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये सर्वात हाय व्होल्टेज सामना हा 9 जून रोजी न्यूयॉर्क येथे होणार आहे. भारत - पाकिस्तान हे दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यादरम्यान प्रेक्षकाचा उत्साह जेवढा टिपेला असतो तेवढाच सामन्यादरम्यान सुरक्षेचा प्रश्न देखील महत्वाचा असतो.

आपण भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्यात एका चाहत्याने मैदानात नुसती घुसखोरी केल्यावर तेथील सुरक्षा रक्षकांनी कशा प्रकारे या चाहत्याला पकडलं होतं हे पाहिलं आहे. आता भारत - पाकिस्तान सामन्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून युएसएमधील पोलीस सज्ज झाले आहेत.

IND vs PAK
Cricket Video: लाईव्ह सामन्यातच मोठी दुर्घटना, जबरदस्त सिक्स ठोकल्यानंतर लगेचच फलंदाजाने गमवला जीव; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमेरिकेत कडक सुरक्षा व्यवस्था

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ISIS समर्थक गटाने या स्पर्धेला लक्ष्य करण्याची धमकी दिली होती, त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षा उपायांमध्ये स्निपरसह SWAT टीमचा समावेश असेल. मैदानात साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील.

आयसीसी काय म्हणालं?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बीबीसी स्पोट्सला दिलेल्या माहितीनुसार, “आयसीसी इव्हेंटमधील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे.

IND vs PAK
Kedar Jadhav Retirement : टी-20 वर्ल्ड कपदरम्यान केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती!

9 जूनला भिडणार भारत - पाकिस्तान

नासाऊ काऊन्टी पोलीस विभागाने 3 ते 12 जून दरम्यान या मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक

(Cricket News Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com