शाहीन आफ्रिदीची बॉलिंग बघायला सासरा मैदानात, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 AFGvs PAK
शाहीन आफ्रिदीची बॉलिंग बघायला सासरा मैदानात, पण...

शाहीन आफ्रिदीची बॉलिंग बघायला सासरा मैदानात, पण...

Afghanistan vs Pakistan : दुबईच्या मैदानात सुपर 12 च्या दुसऱ्या गटातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगला आहे. पाकिस्तानी संघातील लक्षवेधी जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या सासऱ्याने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. हा माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी आहे. शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा आणि शाहीन शहा आफ्रिदी यांचा विवाह होणार आहे. शाहिद आफ्रिदीसह शाहीन आफ्रीदीच्या वडीलांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता.

शाहिद आफ्रिदीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन स्टेडियमवर मॅच पाहत बसल्याचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या आजुबाजूलाही कोणीतरी बसल्याचे दिसते. यात नेमकी त्याची मोठी मुलगी आणि शाहीन आफ्रिदीची होणारी पत्नी अक्सा आहे की इतर घरती मंडळी आहेत? असा प्रश्न फोटो पाहणाऱ्याला पडू शकतो.

हेही वाचा: T 20 WC : तालिबानकडून अफगाणिस्तानच्या खेळाडूंना धमकी

शाहीन शाह आफ्रिदीनं भारता विरुद्धच्या सामन्यात दोन चेंडूमध्ये डावला कलाटणी दिली होती. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलला बाद करत त्याने पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. टी-20 क्रिकेटमध्ये शाहीन आफ्रिदीचे रेकॉर्ड खास असेच आहे. पावर प्लेमधील तो सर्वात घातक गोलंदाज असून प्रत्येक तीन मॅचनंतर तो पहिल्या षटकात विकेट घेतो.

हेही वाचा: T20 WC : गत चॅम्पियन अखेर जिंकला, पूरन ठरला हिरो!

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीला भेदक मारा करता आला नाही. त्याने 4 षटकांच्या आपल्या कोट्यात 22 धावा खर्च करुन एकच विकेट घेऊ शकला. यात त्याने एक नो आणि वाइडसह 4 अवांतर धावा दिल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pakistan cricket
loading image
go to top