NZ vs AUS : फायनलपूर्वी समोर आले नीशमच्या व्हायरल फोटोमागचं सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new zealand cricket team
NZ vs AUS : फायनलपूर्वी समोर आले नीशमच्या व्हायरल फोटोमागचं सत्य

NZ vs AUS : फायनलपूर्वी समोर आले नीशमच्या व्हायरल फोटोमागचं सत्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाला थोपवल्यानंतर खेळाडू एकच जल्लोष करताना पाहायला मिळते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मात्र एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. न्यूझीलंडच्या संघाने इग्लंडला नमवून फायनल गाठली. या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या नीशमने विजयाचा आनंदच व्यक्त केला नाही.

नीशमने 11 चेंडूत केलेली 27 धावांच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडच्या संघाला फायनलचे तिकीट मिळाले. न्यूझीलंडच्या विजयानंतर नीशमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. यात तो एका कोपऱ्यात शांतपणे बसल्याचे दिसले. या फोटोमागचे सत्य आता समोर आले आहे. आम्ही केवळ सेमी फायनल जिंकायला आलेलो नाही. त्यामुळे जो काही आनंद व्यक्त करायचा आहे तो फायनल जिंकल्यानंतर करेन, अशा भावना नीशमने व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते...

नीशमने न्यूझीलंड क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले. तो म्हणाला की, केवळ सेमी फायनल जिंकण्यासाठी तुम्ही अर्ध्या जगाचा प्रवास करत नाही. आम्ही फायनल सामन्यावर फोकस करत आहोत. व्यक्तीगत तसेच संघातील सदस्य म्हणून मी खूप पुढचा विचार करत नाही. फायनल जिंकल्यावर मोकळेपणाने आनंद व्यक्त करणे योग्य ठरेल. आयसीसी स्पर्धेत खेळण्याचा आमच्याकडे उत्तम अनुभव आहे.

हेही वाचा: AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला...

या अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहोत, असेही तो यावेळी म्हणाला. सलामीवर डॅरेल मिशेल याच्यासोबतच्या भागीदारीविषयी देखील त्याने भाष्य केले. प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची आमची रनणिती होती. जार्डनच्या चेंडू खेळण्यापूर्वी डॅरेल मिशेलने डोक्यात काय सुरु आहे असा प्रश्न केला होता. यावेळी मी या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितल्याचा किस्साही त्याने शेअर केला.

loading image
go to top