भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Rizwan
भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएईच्या मैदानात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दिमाखात फायनल गाठली. एका बाजूला स्पर्धेबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघावर टीका होत असताना दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) दाखवलेला 'जज्बा' कौतुकास्पद ठरत आहे. आयसीयूमध्ये उपचारानंतर रिझवान मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला होता.

हेही वाचा: खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल

विशेष म्हणजे रिझवानवर उपचार करणारे डॉक्टर हे भारतीय आहेत. त्यांनी रिझवानसंदर्भात मोठी माहिती दिली आहे. छातीमध्ये इन्फेक्शन असल्यामुळे मॅचपूर्वी रिझवान 30 तासाहून अधिक काळ आयसीयूमध्ये होता. त्यानंतर मैदानात उतरुन त्याने 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली होती. रिझवानवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉ. सहीर सैनलाबदीन यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रिझवानवर उपचार सुरु होता त्यावेळी मला खेळायचं आहे, संघासोबत रहायचे आहे, अशा भावना रिझवानने बोलून दाखवल्या. प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तो या आजारातून उठून खेळायला आला. तो एवढ्या कमी वेळात या आजारातून उठला त्याच आश्चर्य वाटतं. हा एक चमत्कारच आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

हेही वाचा: सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

रिझवानला 9 नोव्हेंबरला रात्री छातीमध्ये दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी त्याला आयसीयूत ठेवण्याची वेळ आली. त्याची परिस्थिती अगदी नाजूक असल्यामुळे मेडिकल टीमने त्याला आयसीयूत निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने सेमी फायनलमध्ये खेळण्यासाठी खूपच वेगाने स्वत:ला रिकव्हर केलं. ही गोष्ट चमत्कारिक वाटते, असे डॉक्टर म्हणाले.

loading image
go to top