T20 World Cup: फक्त 4 धावांचा फरक... दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सामन्यात अंपायरचा 'तो' निर्णय ठरला वादग्रस्त

South Africa vs Bangladesh: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला, पण या सामन्यातील एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे.
South Africa | T20 World Cup 2024
South Africa | T20 World Cup 2024Sakal

T20 World Cup 2024, SA vs BAN: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सोमवारी (10 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना पार पडला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याबद्दल सध्या चर्चा होत आहे.

झाले असे की दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या 4 विकेट्स 50 धावांवरच गमावल्या होत्या. पण त्यानंतर तोहिद हृदोय आणि महमुद्दुलाह यांनी डाव सावरला होता. ते दोघे फलंदाजी करत होते, तोपर्यंत बांगलादेशच्या विजयाच्या आशा उंचावलेल्या होत्या.

South Africa | T20 World Cup 2024
T20 World Cup 2024: भारताविरुद्ध पराभवानंतरही पाकिस्तानच्या आशा जिंवत, जाणून घ्या कसे आहे सुपर-8 साठी समीकरण

यावेळी 17 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीसाठी ओटनील बार्टमॅन आला. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळण्यास महमुद्दुलाह चूकला, त्यामुळे चेंडू त्याच्या पुढच्या पायाच्या पॅडला लागून फाईन लेगच्या बाऊंड्री पार गेला. पण यावेळी दक्षिण आफ्रिकेने केलेल्या अपीलवर पंचांनी त्याला पायचीत बाद दिले.

मात्र मेहमुद्दुलाहने हृदोयशी बोलून डीआरएसची मागणी केली. यामध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जातानाचे दिसल्याने पंचांना निर्णय बदलावा लागला आणि महमुद्दुलाहला जीवदान मिळाले. मात्र, नियमानुसार पंचांनी आधी बाद दिलेला असल्याने त्याचवेळी हा चेंडू डेड झाल्याचे घोषित झाल्याने बांगलादेशला चौकार मिळाला नाही.

मात्र त्याक्षणी प्रत्येक धाव महत्त्वाची असल्याने हा चौकार न मिळाल्याचा फटका बांगलादेशला बसला होता. महत्त्वाचे म्हणजे अखेरीस बांगलादेश हा सामना अवघ्या 4 धावांनी पराभूत झाल्याने या घटनेबद्दल सध्या चर्चा होत आहे.

याबद्दल बांगलादेशचा खेळाडू हृदोयनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या विकेटबाबतही नाराजी व्यक्त करताना म्हटले की पंचांच्या कामगिरीतही सुधारणा व्हायला हवी.

South Africa | T20 World Cup 2024
T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर बांगलादेशविरुद्ध रोमांचक विजय; सुपर-8 मध्येही थाटात एन्ट्री
South Africa | T20 World Cup 2024
T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर बांगलादेशविरुद्ध रोमांचक विजय; सुपर-8 मध्येही थाटात एन्ट्री

हृदोयला 18 व्या षटकात कागिसो रबाडाने पायचीत केले होते. त्यावेळीही पंचांनी बाद दिल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यु घेतला होता, ज्यात चेंडू लेग स्टंपला हलका स्पर्श करताना दिसला होता, त्यामुळे अंपायर्स कॉल देण्यात आल्याने हृदोयला ३७ धावांवर विकेट गमवावी लागली होती.

या सामन्यात अखेरच्या षटकात बांगलादेशला 11 धावांची गरज असताना केशव महाराजने जेकर अली (8) आणि महमुद्दुलाह (20) यांना बाद केले. शेवटी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 7 बाद 109 धावांवर रोखले.

दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या,तसेच कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. त्याचबरोबर डेव्हि़ड मिलरने 29 धावा केल्या, तर क्विंटन डी कॉकने 18 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 113 धावा केल्या.

बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तांझिम हसन साकिबने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमदने 2 विकेट्स घेतल्या, तर रिषाद हुसैनने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com