T20 World Cup 2024: भारताविरुद्ध पराभवानंतरही पाकिस्तानच्या आशा जिंवत, जाणून घ्या कसे आहे सुपर-8 साठी समीकरण

Pakistan Cricket: पाकिस्तानचे सलग दोन पराभवानंतरही अद्याप टी20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपलेले नाही. त्यांच्यासमोर आता पुढील समीकरण कसे असणार आहे, जाणून घ्या.
Pakistan Cricket team
Pakistan Cricket teamX/ICC

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध रविवारी न्युयॉर्कला झालेल्या सामन्यात 6 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हा पाकिस्तानचा टी20 वर्ल्ड कपमधील सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे पाकिस्तानसाठी पुढील वाटचाल कठीण झाली आहे. पण असे असले तरी त्यांचे आव्हान अद्यापही जिवंत आहे.

पाकिस्तानने याआधी या स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना केला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात सध्या शून्य पाँइंट्स आहेत. पाकिस्तान या स्पर्धेत पहिल्या फेरीत ए ग्रुप मध्ये आहे. या ग्रुपमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे संघ सुपर आठमध्ये पोहचणार आहेत.

Pakistan Cricket team
Danielle Wyatt: विराटला लग्नाची मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटपटू गर्लफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, पाहा Photo

सध्या भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकल्याने त्यांचे 4 पाँइंट्स आहेत. पण भारत +1.455 नेट रन रेटसह अव्वल क्रमांकावर आहे, तर अमेरिका +0.626 नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी पुढील मार्ग सोपा आहे.

तसेच कॅनडाने 2 सामन्यांतील 1 सामना जिंकला असल्याने त्यांचे 2 पाँइंट्स आहेत. त्यामुळे कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय आयर्लंडनेही पाकिस्तानप्रमाणे दोन्ही सामने पराभूत झाले आहेत.

त्यामुळे आता पाकिस्तानला आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर कॅनडा आणि आयर्लंड या संघांविरुद्ध होणारे सामने जिंकावेच लागणार आहेत. त्यांनी यातील एकही सामना पराभूत झाला, तर मात्र त्यांचे आव्हान संपणार आहे.

पण त्यांना जर या दोन्ही सामन्यांत विजय मिळवता आला, तर आशा करावी लागेल की भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांपैकी एक संघ त्यांचे उर्वरित दोन्ही सामने पराभूत होईल.

Pakistan Cricket team
IND vs PAK: शास्त्रींचं ड्रेसिंग रूममध्ये आगमन अन् टीम इंडियाचा टाळ्यांचा कडकडाट, कोणी पटकावलं फिल्डिंग मेडल, पाहा Video

तसेच पाकिस्तानला याचीही काळजी घ्यावी लागणार आहे की ते कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवतील, ज्यामुळे त्यांना नेट रन रेट सुधारेल आणि ते भारत किंवा अमेरिकेला मागे टाकू शकतील.

एकूणच पाकिस्तानला आता उर्वरित सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत आणि अमेरिका यांनी आता एक जरी विजय मिळवला, तरी त्यांचे सुपर-8 मधील स्थान जवळपास पक्के होणार आहे.

ग्रुप ए मधील उर्वरित सामने

  • 11 जून - कॅनडा वि. पाकिस्तान (न्यूयॉर्क) रात्री 8

  • 12 जून - भारत वि. अमेरिका (न्यूयॉर्क) रात्री 8

  • 14 जून - अमेरिका वि. आयर्लंड (लॉडरहील) रात्री 8

  • 15 जून - भारत वि. कॅनडा (लॉडरहील) रात्री 8

  • 16 जून - आयर्लंड वि. पाकिस्तान (लॉडरहील) रात्री 8

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com