IND vs BAN : रोहित शर्मानं सलामी जोडीदार बदलला; यशस्वी ऐवजी दिली या खेळाडूला संधी मात्र...

IND vs BAN Warm Up T20 WC 24 : रोहित शर्माने सराव सामन्यात एका एक प्रयोग अन् सहा चेंडूतच तो फसला
Sanju Samson
T20 World Cup 2024 India Vs Bangladesh esakal

T20 World Cup 2024 India Vs Bangladesh : आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने नाणेफेकीनंतर विराट कोहली आजचा सामना खेळणार नसल्याचं सांगितलं. त्यानं प्रथम फलंदाजी करण्याचं असं विशेष कोणतं कारण सांगितलं नाही. मात्र सलामी जोडीत त्यानं बदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

Sanju Samson
Dinesh Karthik : मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की... भावनिक पोस्ट करत कार्तिकने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर सलामी देण्यासाठी रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल येण्याची शक्यता होती. विराट आजचा सामना खेळत नसल्यानं यशस्वीच सलामीला येईल असं सर्वांनी गृहित धरलं होतं. मात्र रोहितसोबत संजू सॅमसन सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

परंतु सलामीला आलेल्या संजू सॅमसनला फारशी चमक दाखवता आली नाही. तो सहा चेंडूत एक धाव करत बाद झाला. संजू बाद झाल्यानंतरही यशस्वी फलंदाजीला आला नाही. त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने देखील आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. रोहित अन् पंतनं भारताला 6 षटकात 55 धावांच्या जवळ पोहचवलं.

Sanju Samson
IND vs BAN Live Streaming : भारताचा बांगलादेशविरूद्ध 'सराव', कधी अन् कुठं पाहायचा सामना?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर रोहित म्हणाला की, 'कोणत्या विशिष्ट कारणाने आम्ही प्रथम फलंदाजी घेतलेली नाही. इथली परिस्थिती सतत बदलत असते. विराट कोहली नुकताच न्यूयॉर्कमध्ये पोहचला आहे. त्यामुळे तो आजचा सराव सामना खेणार नाहीये. त्याला सोडून संघातील इतर सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. आम्ही कोणाला कधी वापरायचं हे ठरवू. आम्ही इथं खूप लवकर आलो आहे. आमचे शरीर आता इथल्या वातावरणाशी अॅडजस्ट झालं आहे. आता आम्ही इथल्या प्लेईंग कंडिशनशी कसे जुळवून घेतो हे पाहावं लागेल.

 (Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com