T20 World Cup 2024मध्ये झाली फिक्सिंग? वादात सापडला IND vs IRE सामना, जाणून घ्या प्रकरण

T20 World Cup 2024 India vs Ireland Match Toss Controversy: टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने शानदार विजयी सलामी दिली.
India vs Ireland Match Toss Controversy
India vs Ireland Match Toss ControversySAKAL

T20 World Cup 2024 India vs Ireland : फलंदाजी करणे अत्यंत कठीण असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला ९६ धावांत गुंडाळण्याची कामगिरी केली. त्यानंतर रोहित शर्माचे अर्धशतक आणि रिषभ पंतच्या नाबाद ३६ धावांच्या जोरावर ८ विकेट व ४६ चेंडू राखून विजय मिळवला आणि टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण याआधी मैदानावर असं काही घडलं की सोशल मीडियावर चाहत्यांनी मॅच फिक्स झाल्याचा दावा करायला सुरुवात करत आहे.

India vs Ireland Match Toss Controversy
Hardik Pandya-Natasa Stankovic : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची 'पांड्या'बाबतची 'ती' पोस्ट चर्चेत; इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत....

खरं तर, जेव्हा रोहितने नाणे फेकले आणि ते खाली पडले तेव्हा सामनाधिकारी गोंधळलेले दिसले. मॅच रेफरीने प्रथम सांगितले की आयर्लंडने नाणेफेक जिंकली होती, पण नंतर त्यांनी सांगितले की रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे.

फक्त याच कारणावरून लोकांनी सोशल मीडियावर टॉसवर वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावर लोक विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हटलं की बीसीसीआयनं आयसीसीला विकत घेतलंय, तर कुणी म्हटलं की मॅच पूर्णपणे फिक्स आहे.

India vs Ireland Match Toss Controversy
Suni Chhetri Retirement : 'माझी निवृत्ती महत्त्वाची नाही तर देशासाठी....' अखेरच्या सामना खेळण्यासाठी छेत्री उतरणार मैदानात

एकीकडे चाहते नाणेफेकीवरून बीसीसीआय आणि आयसीसीला ट्रोल करत असताना दुसरीकडे एका चाहत्याने हा संपूर्ण प्रकार काय झाला हे सांगितले. चाहत्यांनी सांगितले की, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग हेड म्हणाला होता. पण रेफरीला त्याचा कॉल ऐकू आला नाही, म्हणून त्याने स्टर्लिंगकडे बोट दाखवले आणि विचारले की त्याचा कॉल काय आहे. पॉलने हेड मागितले होते, पण नाण्याने टेल्स दाखवली होती, त्यामुळे रेफ्रींनी नंतर रोहित शर्माकडे बोट दाखवून नाणेफेक जिंकल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com