IND vs PAK: शास्त्रींचं ड्रेसिंग रूममध्ये आगमन अन् टीम इंडियाचा टाळ्यांचा कडकडाट, कोणी पटकावलं फिल्डिंग मेडल, पाहा Video

Team India Fielding Medal: टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये फिल्डिंग मेडल देण्यात आले.
Ravi Shastri | Team India
Ravi Shastri | Team IndiaSakal

T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारतीय क्रिकेट संघात 2023 वनडे वर्ल्ड कपपासून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये मेडल देण्याची परंपरा सुरू झाली आहे. हीच परंपरा सध्या सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही कायम करण्यात आली आहे.

रविवारी न्युयॉर्कमध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतरही हे मेडल देण्यात आले. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हे मेडल देण्यापूर्वी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी संघातील खेळाडूंनी केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले.

Ravi Shastri | Team India
IND vs PAK, Video: पराभवाचं दु:ख सहन होईना… रोहितनं रडणाऱ्या नसीमला दिला धीर; पाकिस्तानचा एकटा भिडू लढला

व्हिडिओत दिसते की नंतर टी दिलीप यांनी हे मेडल जिंकण्यासाठी दावेदार असलेल्या खेळाडूंची नावे सांगताना त्यांच्या कामगिरीचेही कौतुक केले. त्यांनी आधी ऋषभ पंतने केलेल्या यष्टीरक्षणाचे कौतुक केले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने बाबर आझमचा घेतलेल्या झेलाचंही त्यांनी कौतु केले. त्याचबरोबर अर्शदीप सिंगचेही यामध्ये नाव घेतले.

यानंतर या मेडलाचा विजेता घोषित करण्यासाठी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये समालोचन करणारे रवी शास्त्री यांना आमंत्रित केले. रवी शास्त्रींना पाहून भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष झाला.

यानंतर शास्त्रींनी दोन शब्द बोलायला हवेत असा आग्रह देखील खेळाडूंकडून करण्यात आला, त्यावर शास्त्री म्हणाले, मी बोलणार तर आहेच. पण आधी मी विजेत्या खेळाडूला मेडल देतो. त्यांनी विजेता खेळाडू म्हणून ऋषभ पंतचे नाव घोषित केले.

त्यांनी ऋषभला मेडल देण्यापूर्ण कडकडून मिठी मारली. इतकेच नाही, तर ऋषभ पंतने अपघातानंतर कठोर मेहनत करत पुनरागमन केल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी म्हटले की पुनरागमनानंतर फलंदाजी सोपी होती, पण ऋषभने यष्टीरक्षणही केल्याचे कौतुक आहे. या व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताला प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वाबाद 119 धावाच करता आल्या. त्यानंतर 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com