T20 World Cup: टीम इंडिया विराटबाबत करतेय मोठी चूक... IND vs PAK सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचं मोठं भाष्य

Virat Kohli: भारतीय संघाकडून विराटबाबत मोठी चूक होत असल्याचं मत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.
Virat Kohli
Virat KohliSakal

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (9 जून) न्युयॉर्कमध्ये सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा सामना होणार असल्याने या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

यासामन्याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलनेही या सामन्याबद्दल बोलताना भारतीय संघाकडून काय चूक होत आहे, याबद्दलचे त्याचे मत मांडले आहे.

त्याच्यामते विराट कोहलीला सलामीला पाठवणे चुकीचे आहे. विराटने या टी20 वर्ल्ड कपमधील आयर्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी केली होती. पण विराटला 5 चेंडूत एकच धाव करता आलेली.

Virat Kohli
T20 World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात कोण असणार अंपायर? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

दरम्यान, याबाबत आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना अकमल म्हणालेला 'मला वाटत नाही की भारतीय संघाची फलंदाजी क्रमवारी बरोबर आहे. विराट तिसऱ्या क्रमांकाचा दबाव झेलू शकतो आणि सामना संपवू शकतो. जे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.'

'यशस्वी जैस्वालने सलामीला फलंदाजी करावी आणि विराटने तिसऱ्या क्रमांकावर यावे. जर भारताने हीच फलंदाजी क्रमवारी कायम ठेवली, तर ते एखाद्या क्षणी अडखळू शकतात.'

'विराट तिसऱ्या क्रमांकावर येऊन एक बाजू सांभाळू शकतो आणि सामना संपवू शकतो. मला वाटते की विराटला सलालीला पाठवून भारतीय संघ चूक करत आहे.'

विराटने आयपीएल 2024 मध्ये सलामीला फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने 15 सामन्यांत 741 धावा ठोकल्या होत्या.

Virat Kohli
T20 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी 'हे' दोन खेळाडू ठरणार एक्स फॅक्टर, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा इशारा

दरम्यान, भारतीय संघाने याआधी न्युयॉर्कला झालेल्या आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच भारतीय संघाचे अनेक खेळाडू फॉर्ममध्येही आहेत. मात्र, पाकिस्तानला त्यांच्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

याबद्दल बोलताना अकमल म्हणाला, 'भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. बुमराहने चांगले गोलंदाजी केली आहे, सिराजनेही चांगली गोलंदाजी केली. हार्दिक पांड्यालाही विकेट्स मिळाल्या. त्यांना या मैदानात (न्युयॉर्क) तीन सामने खेळायचे आहेत, ज्याचा त्यांना फायदा होईल.'

याशिवाय त्याने असेही म्हटले की आयसीसीने आणखी चांगल्या खेळपट्ट्या तयार करायला हव्या होत्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com