Murder : बाहेरून फिरून येतो अस म्हणत घराबाहेर पडला अन् झाला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

बाहेरून फिरून येतो अस म्हणत घराबाहेर पडला अन् झाला खून

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डीजीटल झोनजवळ युवकाचा तीन ते चार आरोपींनी दगडाने ठेचून खून केला. हे हत्याकांड जुन्या वैमनस्यातून घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संजयसिंह रविंद्रसिंह गौर (३५, रा. म्हाडा कॉलनी, वाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयसिंह हा पेंटिंग कामाचे ठेके घेत होता. तो सोमवारी बालाघाट येथे राहणाऱ्या मामाकडे वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. येथून तो बुधवारी रात्री घरी परतला. बाहेरून फिरून येतो, एवढे सांगून तो घराबाहेर पडला. संजयला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशीही तो दारू पिण्यासाठी गेला असावा, अशी चर्चा आहे.

हेही वाचा: Petrol-Diesel Price : कर कमी करण्यासाठी नागपुरात आंदोलन

घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. तो मित्रासोबत दारू पिण्यासाठी डीजीटल झोनजवळील मोकळ्या मैदानावर गेला असावा. तेथे आरोपींसोबत वाद झाला असावा. त्यामुळे आरोपींनी दगडाने ठेचून संजय याचा खून केल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील डिजिटल झोनच्या मागे असलेल्या नाल्याजवळ संजयचा मृतदेह सुरक्षारक्षकाला दिसल्याने खळबळ उडाली.

याबाबत त्याने नागरिकांनी माहिती दिली. एकाने पोलिस नियंत्रण कक्षात फोन लावून पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी, वाडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींविरूद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: दुचाकींच्‍या अपघातात एक ठार; मृताच्या कंबरेला सापडला खंजीर!

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

संजयचे हत्याकांड घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले. संजय आणि अन्य दोन आरोपी हे तिघेही डीजीटल झोनच्या रस्त्याकडे जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आलेल्या दोन्ही युवकांचा शोध घेणे सुरू केले आहे. आरोपी हे संजय याच्या ओळखीचेच असल्यामुळे लवकरच अटक करण्यात येण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

loading image
go to top